सर्वाधिक दूध पुरवठा करणार्‍या संस्था व कृत्रिमरेतकांचा गौरव :परजणे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वाधिक दूध पुरवठा करणार्‍या संस्था व कृत्रिमरेतकांचा गौरव :परजणे

कोपरगाव ता.प्रतिनिधी : गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या पुण्यस्मर

संगमनेरमध्ये दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
टीडीएफ माध्यमिक शिक्षक संघाच्या सभेत एकजुटीचा नारा
पिंपरी निर्मळ येथील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा

कोपरगाव ता.प्रतिनिधी : गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संघाला वर्षभरात सर्वाधिक दुधाचा पुरवठा व सर्वाधिक दर देणार्‍या प्राथमिक दूध संस्था, सर्वाधिक कृत्रिमरेतन गर्भधारणेचे काम करणार्‍या कृत्रिमरेतकांचा गौरव संघाच्या कार्यस्थळावर नुकताच करण्यात आला.
गोदावरी दूध संघाचे संस्थापक नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांचा अठरावा पुण्यस्मरण सोहळा संघाच्या कार्यस्थळावर संपन्न झाला. नाशिक येथील गोखले शिक्षण संस्थेचे एच. पी. टी. महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विजयकुमार वावळे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तर संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी संघाच्या कार्यस्थळावरील स्व. नामदेवराव परजणे पाटील आण्णा यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन पाहुण्यांनी प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. त्यानंतर झालेल्या गौरव सोहळ्यात राजेश परजणे पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी स्वागत केले. नगर जिल्ह्याने संपूर्ण देशाला सहकाराची दिशा दाखविली आहे. त्यात कोपरगांवच्या गोदावरी दूध संघाने दुग्ध व्यवसायामध्ये मोठी क्रांती केलेली आहे. सहकारातीत काम प्रामाणिक आणि निष्ठापूर्वक असेल तर सामाजिक आणि आर्थिक विकास करता येतो हे स्व. परजणे आण्णा यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिलेले आहे. संघाला वर्षभरात सर्वाधिक दूध पुरवठा करणार्‍या जय बजरंग दूध संस्था (पढेगांव), कल्पतरु महिला दूध संस्था ( कोर्‍हाळे), द्वारकामाई महिला दूध संस्था (पिंपळस). सर्वाधिक दर देणार्‍या संस्थांमध्ये अस्तगांव सहकारी दूध संस्था ( अस्तगांव), जनसेवा दूध संस्था ( पिंपळवाडी), जनार्दन दूध संस्था ( अस्तगांव), सर्वाधिक दर देणारे संकलन केंद्रे ओजस्वी संकलन केंद्र तर वर्षभरात सर्वाधिक कृत्रिमरेत गर्भधारणेचे काम करणारे डॉ. नवनाथ कवडे ( धामोरी), डॉ. बाळासाहेब कोल्हे ( सोनेवाडी), डॉ. भाऊसाहे जाधव (कुंभारी) यांचा मानपत्र देऊन उत्कृष्ठ कामगिरीबद्दल पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. संघाचे कर्मचारी कै. गजानन कराळे यांच्या अपघाती निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांना 20 लाख रुपयाचा आपघाती विम्याचा धनादेश यावेळी वितरीत करण्यात आला. संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांचेही भाषण झाले. कार्यक्रमास स्टेट बँकेच्या नगर शाखेचे रिजनल मॅनेजर लिंबराज मोहोळकर, शाखा व्यवस्थापक शेवाळे, कृषी अधिकारी धनाजी भागवत, कोपरगांव शाखेचे व्यवस्थापक राजेंद्र संधानशिवे, व्यवस्थापक अमितकुमार दुबे, संघाचे संचालक राजेंदबापू जाधव, उपाध्यक्ष संजय खांडेकर यांच्यासह संघाचे सर्व संचालक, पदाधिकारी, दूध उत्पादक उपस्थित होते. कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी सूत्रसंचालन केले. तर संचालक उत्तमराव माने यांनी आभार व्यक्त केले.

COMMENTS