Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एनडीएच्या शपथविधीसाठी अकोल्यातून राहुल देशमुख यांची उपस्थिती

अकोले ः भाजपप्रणित एनडीए सरकारचा शपथविधी रविवारी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनामध्ये संपन्न झाला. या शपथविधीसाठी देशभरातील अनेक मान्यवरांना निमं

बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या तालुकध्यक्षपदी शरद खरात
वित्त आयोग निधी अपहारप्रकरणी सरपंचासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
प्रदीप मकासरे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

अकोले ः भाजपप्रणित एनडीए सरकारचा शपथविधी रविवारी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनामध्ये संपन्न झाला. या शपथविधीसाठी देशभरातील अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते, यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भाजप चे तालुका सरचिटणीस तथा विस्तारक युवा नेते राहुल देशमुख यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. राहुल देशमुख हे दिल्लीला रवाना होत या कार्यक्रमाला उपस्थित होते.
राहुल देशमुख यांनी अकोले तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्षपद भूषविलेले असून त्यांनी अनेक युवकांचे संघटन बांधून भाजप हा ग्रामीण भागात पोहोचविण्याचे काम केले आहे. सध्या त्यांच्यावर पक्षानी तालुका सरचिटणीस पदाबरोबर विस्तारकाची जबाबदारी दिली असून ते सदर जबाबदारी अतिशय सक्षम पणे सांभाळत आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत त्यांनी गुजरात राज्यातील एका जिल्ह्याच्या प्रभारी म्हणून काम केले आहे. भाजप संघटनेत सक्षम पणे जबाबदारी सांभाळत असल्याने त्यांना शपथविधीला निमंत्रित केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. त्यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी माजीमंत्री मधुकरराव पिचड, अनुसूचित जन जाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री माजी आमदार वैभवराव पिचड, भाजप तालुकाध्यक्ष यशवंतराव आभाळे, जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे, जेष्ठ नेते शिवाजी राजे धुमाळ, गिरजाजी जाधव, जालिंदर वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे, सुनील दातीर, सुधाकरराव देशमुख, मच्छिंद्र मंडलिक, सचिन जोशी, माधव भोर ,अशोक आवारी, कवीराज भांगरे, आदींसह भाजपच्या सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS