हिंगोली / प्रतिनिधी ः हिंगोलीतल्या रामलिला मैदानावर ओबीसी समाजाची दुसरी सभा सुरु आहे. या सभेसाठी मंत्री छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, बबनराव तायवाडे,

हिंगोली / प्रतिनिधी ः हिंगोलीतल्या रामलिला मैदानावर ओबीसी समाजाची दुसरी सभा सुरु आहे. या सभेसाठी मंत्री छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, बबनराव तायवाडे, महादेव जानकर यांच्यासह राज्यातील विविध समाजाच्या नेत्यांची उपस्थिती आहे.
माजी मंत्री महादेव जानकर म्हणाले की, ओबीसींनी ठरवले पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्थेत जायचे नाही. व्हायचे तर आमदार आणि खासदारच व्हायचे. ओबीसींनी ठरवले तर यांना झेंडा धरायलाही माणसे मिळणार नाहीत. ओबीसींनी जागरुन होऊन आपल्या हक्कासाठी जागरुक राहिले पाहिजे.
ओबीसी समाजाने डिमांडर होण्यापेक्षा कमांडर झाले पाहिजे. मिळमिळीत भूमिका घेऊन आता चालणार नाही. या ओबीसी लढ्यामध्ये दलित आणि मुस्लिम समाज बांधवांनाही सोबत घेतले पाहिजे. सर्वांनी मिळून राजकारणात उतरून ताकद दाखवून दिली पाहिजे, असेही जानकर म्हणाले. भुजबळ साहेब, आम्ही तुमच्याबरोबर युती करायला तयार आहोत. परंतू त्यांच्याबरोबर जाणार नाही. वंजारी, धनगर, माळी या समाजातून आपण पैसा उभा करु शकतो. तुम्ही आमचे माईलस्टोन नेते आहात. गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ एकत्र आले असते तर क्रांती झाली असती, असे महादेव जानकर म्हणाले.
COMMENTS