Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

57 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची पुर्वतयारी उत्साहपूर्वक

भक्ती भावनेने निरंकारी भक्तांचे सेवाकार्य सुरु

 नगर -महाराष्ट्राच्या 57 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन दि.26 ते 28 जानेवारीला प.पू.सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजप

Ahmednagar : नगरमध्ये मंदिरातील पुजारीच फैलावतात कोरोना (Video)
श्रीरामपूर-शेवगाव रोडवरील सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने
शेत व शिवरस्ते प्रकरणाचा त्वरित निपटारा करावा

 नगर -महाराष्ट्राच्या 57 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन दि.26 ते 28 जानेवारीला प.पू.सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात मिहान, सुमठाणा (नागपूर) येथील विशाल मैदानांवर केले जात आहे. हा विशाल आध्यात्मिक संत समागम यशस्वी करण्यासाठी 24 डिसेंबर 2023 रोजी स्वैच्छिक सेवा कार्याचा शुभारंभ झाल्यापासूनच विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने निरंकारी सेवादलाचे सदस्य, स्वयंसेवक व भाविक भक्तगण मोठ्या तन्मयतेने, निष्ठेने व निष्काम भावनेने समागम स्थळावर पोहचून पूर्वतयारीमध्ये आपले योगदान देत आहेत. अहमदनगर झोनमधून 500 हून अधिक सेवादलाची तुकडी नुकतीच चार दिवसांचे सेवाकार्य संपवून परतले.

 नागपूर नगरीमध्ये प्रथमच महाराष्ट्राचा प्रादेशिक संत समागम आयोजित करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. सर्वविदित आहे की, निरंकारी संत समागम एकत्व, प्रेम आणि विश्वबंधुत्वाचे असे एक अनुपम स्वरुप प्रदर्शित करतो. ज्यामध्ये केवळ निरंकारी भक्त नव्हे तर ईश्वरामध्ये आस्था बाळगणारा प्रत्येक मनुष्य सहभागी होऊन सद्गुरुंच्या शिकवणुकीने प्रेरित होतो आणि आपले जीवन सार्थक बनवतो.

 या दिव्य संत समागमाची पूर्वतयारी अत्यंत उत्साहात भक्तांकडून, सेवादालाकडून केली जात आहे. यात मैदानांचे सपाटीकरण, स्वच्छता, अंतर्गत रस्ते इत्यादी आवश्यक कामे तसेच भव्य असा सत्संग पंडाल, निवासी तंबू, शामियाने इत्यादींची सुंदर नगरी तयार केली जात आहे. महाराष्ट्राच्या वार्षिक निरंकारी संत समागमात प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध संस्कृती, सभ्यतांचे एक अनुपम संगम दृष्टीगोचर होईल, ज्यामध्ये सहभागी होऊन भाविक, भक्तगण अलौकिक आनंदाची अनुभूती प्राप्त करतील तसेच मानवता व विश्वबंधूत्वाची सुंदर भावनांचा दैवी आनंद अनुभवू इच्छिणार्या प्रत्येक भाविक श्रद्धाळू भक्तगणांना मन:पूर्वक अभिवादन आहे.

COMMENTS