नाशिक- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यात 20 दिंडोरी आणि 21 नाशिक लोकसभा मतदार संघासाठी 26 एप्रिल ते 3 मे 2024 या कालावधीत
नाशिक– लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यात 20 दिंडोरी आणि 21 नाशिक लोकसभा मतदार संघासाठी 26 एप्रिल ते 3 मे 2024 या कालावधीत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करताना आवश्यक तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी कळविले आहे.
निवडणुकीची अधिसूचना 26 एप्रिल 2024 रोजी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून प्रसिद्ध करणेत येणार आहे. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 3 ही वेळ निर्धारित करण्यात आली असून या निर्धारित वेळेतच उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल करावयाचे आहे.
नामनिर्देशनपत्र दाखल करणारे इच्छुक उमेदवार व त्यांचे समर्थक यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात फक्त तीन वाहने आणता येणार आहेत. यासाठी पोलिस अधिकारी त्या ठिकाणी शंभर मीटर परिसराची निश्चिती ( मार्कींग ) आधीच निश्चित केली जाईल. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करणारे उमेदवार आणि त्यांच्या समवेत चार व्यक्ती अशा एकूण पाच व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात एकाच दाराने प्रवेश देण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हीडीओ चित्रीकरण करण्यात येईल. निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी पोलिस विभागाकडून सहायक पोलिस आयुक्त दर्जाचे अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार असून पोलिस नोडल अधिकारी या ठिकाणी आवश्यक पोलिस बंदोबस्तासह उपस्थित राहतील.
नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांनी या सर्व बाबींची नोंद घ्यावी. नामनिर्देशन पत्र आयोगाकडून निर्धारित वेळेतच दाखल करावयाचे असून नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळी भारत निवड़णूक आयोगाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
COMMENTS