Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव तालुक्यात मान्सूनपूर्व कामाला वेग

आ.आशुतोष काळेंच्या सूचनेवरून प्रशासनाने दिली गती

कोपरगाव : हवामान खात्याकडून चालू वर्षी देण्यात आलेल्या पावसाच्या अंदाजाच्या पार्श्‍वभूमीवर आ.आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालयात घेतलेल्या मान्सून

आमदार काळेंच्या पुढाकारातून कोपरगावची बाजारपेठ फुलणार
पिण्यासाठी निळवंडे व पालखेड कालव्याचे पाणी द्या
वेस-सोयगाव तलावाच्या 9.98 कोटींच्या कामास मान्यता

कोपरगाव : हवामान खात्याकडून चालू वर्षी देण्यात आलेल्या पावसाच्या अंदाजाच्या पार्श्‍वभूमीवर आ.आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालयात घेतलेल्या मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत प्रशासनाला मान्सूनपूर्व तयारीच्या कामाला गती देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचनेनुसार प्रशासनाच्या सर्व विभागाकडून मान्सूनपूर्व कामाला वेग देण्यात आला आहे.
पावसाळ्यात मतदार संघातील नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येवू नये यासाठी आ. आशुतोष काळे यांनी बुधवार (दि.30) रोजी तहसील कार्यालयात प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. पावसाळ्यात अचानकपणे उद्भवणार्‍या आपत्ती निवारणासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार प्रशासनाच्या विविध विभागाकडून रेंगाळलेल्या कामाला वेग देण्यात आला आहे. यामध्ये वाढलेल्या झाडांच्या फांद्या तारांवर लोंबकळत असल्यामुळे काही ठिकाणी तारांवर घासत असतात व यामुळे विद्युत यंत्रणेची क्षती होवून त्याचा प्रतिकुल परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होवून नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हा संभाव्य त्रास टाळण्यासाठी व नागरिकांना पावसाळा सुसह्य व्हावा यासाठी महावितरणकडून विविध ठिकाणी मान्सुमपुर्व देखभाल व दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत. तुटलेले जुने विजेचे पोल काढून नवीन विजेचे पोल उभे करणे, वीज वाहिन्यांच्या आड येणार्‍या झाडांच्या फांद्या व झाडे-झुडपे तोडण्यासह इतरही अनेक कामे वेगाने सुरू आहेत. सैल झालेले गार्डींग व दोन खांबांमधील झोळ पडलेल्या विद्युत वाहिन्या ओढून घेणे, सर्व विजेचे खांब आणि त्यांचे ताण सुस्थितीत करण्याचे कामही मोठया प्रमाणात हाती घेण्यात आले असून कडक उन्हाच्या झळा झेलत महावितरणचे कर्मचारी देखभाल व दुरुस्तीच्या कामात गुंतले आहेत. तसेच कोपरगाव शहर व ग्रामीण भागात देखील जलःनिस्सारण विभागाकडून शिल्लक कामांचा निपटारा करण्यास वेग आला असून यामध्ये रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी साईड गटार व नालेसफाईच्या कामांना गती देण्यात आली आहे. रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती, बांधीव नाले, कच्चे नाले, खुल्या गटारी स्वच्छ करणे, जलवाहिनी किंवा ड्रेनेज लाइनकरता खोदलेल्या चर सुस्थितीत करणे, ड्रेनेज लाइन चेंबर स्वच्छ आदी सफाईकामे देखील सुरु करण्यात आली असून इतरही अनेक कामे वेगाने सुरू झाली आहेत. पाऊस मोठ्या प्रमाणात असल्याचा अंदाज हवामान खात्याचा असून त्यामुळे मान्सूनपूर्व कामे लवकर सुरू करण्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी वेळीच आढावा घेवून या मान्सूनपूर्व कामांना वेग आल्यामुळे मतदार संघातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

COMMENTS