ठाणे प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awad) यांच्यावर ठाणे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्या
ठाणे प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awad) यांच्यावर ठाणे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनाम देखील देण्याची तयारी दर्शवली होती. यापार्श्वभूमीवर आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाकडून आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. ठाणे सत्र न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर केला आहे. मात्र पोलिसांना सहकार्य करण्याची अट त्यांना घालण्यात आली आहे.
पोलिसांच्या चौकशीला टाळाटाळ करु नये. न्यायालयाचे आभार मानतो. दर दोन दिवसांनी आम्हाला न्यायालयाचे आभार मानावे लागत आहे. माध्यमांनी जे काही खरे आहे ते समोर आणले. महिला कार्यकर्त्यांनी या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांची बाजू घेतली. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचीही साथ मिळाल्याचे ऋता आव्हाड यांनी म्हटले. मात्र हे कुठेतरी थांबले पाहिजे. मात्र अशाप्रकारची बालिश कृत्य करुन दबाव आणू शकत नाही. पोलिसांना माझी नम्र विनंती आहे की खरंच अन्यात होत असेल तर कारवाई व्हावी. मात्र कायदा पायदळी तुडवण्याचे प्रयत्न होऊ नयेत, अशी प्रतिक्रिया ऋता आव्हाड यांनी दिली आहे. रविवारी, 13 नोव्हेबंर 2022 रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमात विनयभंग केल्याचा गंभीर आरोप एका महिलेने आव्हाडांवर केला होता. 40 वर्षीय तक्रारदार महिलेने आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीने शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा दावा केला आहे. त्यानंतर महिलेने स्थानिक पोलिस अधिकार्यांशी संपर्क साधला. पोलिसांनी महिलेला तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात महिलेने जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. याच तक्रारीवरुन पोलिसांनी आव्हाडांविरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
COMMENTS