कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकरवस्ती ब्राम्हणगाव येथील अंगणवाडी मदतनीस सुनिता राजेंद्र इल्हे यांचे चिरंजीव प

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकरवस्ती ब्राम्हणगाव येथील अंगणवाडी मदतनीस सुनिता राजेंद्र इल्हे यांचे चिरंजीव प्रविण राजेंद्र इल्हे याने नँशनल ट्रेनिंग इन्स्टिटयूट हावड़ा कलकत्तामध्ये मशिनिस्ट ग्राईंडर सीआयटीएसचे शिक्षण घेऊन तो या परिक्षेत भारतात दुसरा नबंर आला आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक नबंर आला आहे त्याची नाशिक सातपूर आय टी आय मध्ये मशिनिस्ट ग्राईंडर या ट्रेड साठी ट्रेड इनचार्ज म्हणून निवड झाली आहे. त्यानिमित्ताने शाळेच्या वतीने त्याचा आणि पालकांचा सत्कार करण्यात आला.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन त्याने हे यश मिळवले आहे त्याबद्दल त्याचे ब्राम्हणगावचे सरपंच उपसरपंच ,सदस्य,बनकरवस्ती शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS