Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोहमारे महाविद्यालयाच्या प्राप्ती बुधवंतचे वक्तृत्व स्पर्धेत यश

कोपरगाव : के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. प्राप्ती दीपक बुधवंत (अकरावी विज्ञान) हिने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वित

पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वे होणार… जमिनीसाठी शेतकर्‍यांना नोटिसा
सिव्हील जळीतकांडाच्या तपासात दाखवावा लागला पोलिसी खाक्या
कायदा हा सर्वांसाठी समान कायद्याचे उल्लंघन करणे हा गुन्हा ठरतो,- जिल्हा न्यायाधीश मुजीब एस शेख

कोपरगाव : के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. प्राप्ती दीपक बुधवंत (अकरावी विज्ञान) हिने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांनी दिली आहे.
20 सप्टेंबर 2024 रोजी बी.पी.एच. सोसायटीचे अहमदनगर महाविद्यालय, अहमदनगर यांनी जिल्हास्तरीय रूथबाई हिवाळे वकृत्व स्पर्धा 2024 आयोजित केली होती. सदर स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगांव चा ही समावेश होता. ’सायबर सुरक्षा’ सारख्या अत्यंत ज्वलंत विषयवार महाविद्यालयाची अकरावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु. प्राप्ती बुधवंत हिने आपले अभ्यासपूर्ण विचार व्यक्त करून द्वितीय क्रमांक पटकावला. पुरस्काराचे रोख रक्कम, 4001 /-  सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे पारितोषिक तिला प्राप्त झाले. महाविद्यालयातील विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मिळविलेल्या या यशाबद्दल संस्था व महाविद्यालयाच्या वतीने को.ता.एज्यु.सोसायटीचे अध्यक्ष  अशोकराव रोहमारे, सचिव अ‍ॅड.संजीवदादा कुलकर्णी, विश्‍वस्त मा. संदिपराव रोहमारे, प्र. प्राचार्य प्रो. (डॉ.) विजय ठाणगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांनी तिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे, प्रा. संदिप जगझाप व इतर शिक्षक उपस्थित होते. सदर विद्यार्थिनीस डॉ. शैलेंद्र बनसोडे, प्रा. एन. एन. लोंढे यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS