मुंबई :इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणात प्रशांत कोरटकर याच्यावर गंभीर आरोप असून त्याला जामीन देण्यास कोल्हापूर आणि त्यानंत
मुंबई :इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणात प्रशांत कोरटकर याच्यावर गंभीर आरोप असून त्याला जामीन देण्यास कोल्हापूर आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर त्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे, मात्र कोरटकरने कोलकाता मार्गे दुबईला फरार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
कोरटकरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामध्ये तो दुबईत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वास्तविक मुंबई उच्च न्यायालयाने प्रशांत कोरटकर याला जामीन नाकारला होता. त्यामुळे लपत छपत त्याने दुबई गाठले, असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसली तरी देखील सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो आता चर्चेचा विषय ठरला आहे.
COMMENTS