Homeताज्या बातम्यादेश

प्रज्वल रेवन्नाचा भाऊ सूरजला अटक

बंगळूरू ः जनता दल-सेक्युलर पक्षाचे आमदार सूरज रेवन्ना यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूरज रेवन्ना हे प्रज्वल

निवडणुका पुन्हा लांबणीवर
मविआच्या बैठकीला आंबेडकर मारणार दांडी ?
अंधेरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट?

बंगळूरू ः जनता दल-सेक्युलर पक्षाचे आमदार सूरज रेवन्ना यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूरज रेवन्ना हे प्रज्वल रेवन्ना यांचा भाऊ असून त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप आहे. प्रज्वलवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. दरम्यान, सूरजला पक्षाच्या एका पुरुष कार्यकर्त्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. प्रज्वल रेवन्ना आधीच अटकेत आहेत. अशामध्ये आता त्यांच्या भावाला देखील अटक करण्यात आली आहे. त्यामुळे रेवन्ना कुटुंबांचे पाय आणखी खोलात अडकल्याचे म्हटले जात आहे.

COMMENTS