https://www.youtube.com/watch?v=xuaS1fTikkI मुंबई ः सार्वजनिक बांधकाम विभागात सध्या बदल्यांचा वेगळाच घोळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. कर्तव्यदक्
मुंबई ः सार्वजनिक बांधकाम विभागात सध्या बदल्यांचा वेगळाच घोळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. कर्तव्यदक्ष अधिकार्यांना डावलून निलंबित अधिकार्यांवरच हा विभाग मेहरबान असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच नाशिक विभागाच्या निलंबित कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांना त्याच विभागाच्या मुख्य अभियंता पदावर वर्णी लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या अधीक्षक अभियंत्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे मुख्य अभियंता पदावर रहाणे यांचा बदलीचा कार्यकाळ शिल्लक असतांना देखील त्यांची उचलबांगडी करून त्यांना नाहक मनस्ताप होऊन ’तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन’ करावा लागत आहे. त्यामुळे चांगल्या अधिकार्यांना डावलून निलंबित अधिकार्यांना संधी देण्यामागे मोठे आर्थिक गौडबंगाल असून यातून मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची चर्चा रंगतांना दिसून येत आहे.

COMMENTS