Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्ता कधीच डोक्यात जाणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर : गेल्या दहा वर्षात मी अनेक आव्हानांचा सामना केला आहे. धैर्यपूर्वक या बाबी मी हातळल्या आहेत. राजकारणात अक्षरक्षः कुठल्याही पातळीवर जाऊन आव

आजी-माजी आमदारांचा…संघर्ष शिगेला…; पारनेर, कर्जत व अकोल्यात आमदारकीनंतर पहिल्या थेट लढती
प्रत्येक तालुक्यात दिव्यांगांसाठी शिबिरे घ्या: खा. नीलेश लंके यांची मंत्री डॉ. विरेंद्रकुमार यांच्याकडे मागणी
नाळवंडी जि.प.सर्कल प्रा.राऊत लढवणार-भीमराव कुटे

नागपूर : गेल्या दहा वर्षात मी अनेक आव्हानांचा सामना केला आहे. धैर्यपूर्वक या बाबी मी हातळल्या आहेत. राजकारणात अक्षरक्षः कुठल्याही पातळीवर जाऊन आव्हाने निर्माण केली जात आहेत. मात्र सत्ता कधीही माझ्या डोक्यात जात नाही, सत्ता हेे सेवेचे माध्यम आहे, असेच आम्हाला शिकवले आहे, त्यामुळे सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपुरात व्यक्त केला. ’प्रेस द मीट’ कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, 2014 मध्ये मी पहिल्यांदा राज्याचा मुख्यमंत्री झालो तेव्हा अनेकांच्या मनात शंका होत्या. हा मंत्रीही नव्हता, नवखा आहे, मग कारभार कसा करणार, असा प्रश्‍न अनेकांना पडला होता. पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकांना वाटायचे, सातत्याने विदर्भावरील अन्यायावर बोलणारा व्यक्ती मुख्यमंत्रिपदी बसला की आपल्यावर अन्याय केला. पण पहिल्या पाच वर्षात लोकांच्या लक्षात आले की, आपण विदर्भात खूप काम केले आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याच भागावर अन्याय होऊन दिला नाही. पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात सिंचनाचे अनेक प्रकल्प पूर्ण केले. पायाभूत क्षेत्रात आपण मोठी भरारी घेतली. राज्याचा उपमुख्यमंत्री असताना आपण ऊर्जा विभागाचा 25 वर्षांचा रोडमॅप तयार केला आहे. पुढच्या दोन-तीन वर्षात अशी परिस्थिती येईल की, आपण उद्योगासहित सर्वप्रकारच्या वीजेचे दर कमी करु शकतो, अशी व्यवस्था आपण उभारली आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. यासोबतच आपण राज्यभरात सहा नदीजोड प्रकल्पांची कामे हाती घेतली आहेत. यामुळे विदर्भातील 10 लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे विदर्भाचा कायापालट होणार आहे. हे प्रकल्प अनेक पिढ्यांवर परिणाम करणारे आहेत. गडचिरोली जिल्हा नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया म्हणून उदयाला आले आहे. या भागातील नक्षलवाद कमी झाला आहे. त्यामुळे आगामी काळात विदर्भात औद्योगिक इकोसिस्टीम उभी राहील, असा विश्‍वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमात फडणवीस यांनी नागपूरातील माध्यमांचे आभार मानले. लोकसभेत महायुतील फेक नरेटिव्हचा मोठा फटका बसला होता. तो फेक नरेटिव्ह आम्ही माध्यमांमुळे ब्रेक करु शकलो. भाजपने महाराष्ट्रात 132 जागा जिंकून राजकीय जीवनातील उच्चांक गाठला. महायुतीलाही मोठा विजय मिळाला. मात्र, जनमताचा हा प्रचंड मोठा कौल मिळाल्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. या विजयासोबत आमच्यावर जनतेच्या अपेक्षांचे ओझे आले असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. शिवराजसिंह चव्हाण यांनी राज्यात 20 लाख पंतप्रधान आवास योजनेचे घर देण्याची जाहीर केले आहे. हे अभूतपूर्व आहे. पुढील पाच वर्षात आम्ही सर्वांना त्यांच्या हक्काचे घर देऊ. पंतप्रधान आवास योजना, मोदी आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून घर देऊ आणि त्या घरांना सोलर वीज कनेक्शन देऊ, म्हणजे त्या घरात राहायला जाणार्‍यांना मोफत वीज मिळेल, असा विश्‍वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

दोन-तीन वर्षांत वीजेचे दर कमी करू
पुढील 2-3 वर्षांत उद्योग, गृह यांसारख्या सर्वच क्षेत्रातील वीजेचे दर आपण कमी करणार असल्याचा विश्‍वास मुख्यमंत्रीफडणवीस यांनी व्यक्त केला. अशा प्रकारचे नियोजन ऊर्जा विभागात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आवास योजनांतंर्गत देण्यात येणार्‍या घरांमध्ये सोलार देण्याचा प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले. ऊर्जा विभागाचा पुढील 25 वर्षांचा रोड मॅप आपण तयार केला आहे. पुढील 2-3 वर्षात सर्वच प्रकारचे वीजेचे दर आपण कमी करू शकतो, अशा प्रकारची व्यवस्था ऊर्जा विभागात उभी केली असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

COMMENTS