पुणे : एकीकडे तापत्या उन्हामुळे विजेची मागणी वाढत असल्याने वीज वितरण यंत्रणेवर ताण आला आहे. त्यातच शहरी व ग्रामीण भागात असलेल्या महापारेषण व
पुणे : एकीकडे तापत्या उन्हामुळे विजेची मागणी वाढत असल्याने वीज वितरण यंत्रणेवर ताण आला आहे. त्यातच शहरी व ग्रामीण भागात असलेल्या महापारेषण व महावितरणच्या वीजयंत्रणेजवळ किंवा वीजतारांखाली उस, गवत व कचरा पेटवण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या महिन्याभरात आगीमुळे पारेषण व वितरण यंत्रणेत सहा ठिकाणी बिघाड झाल्यामुळे तब्बल ६ लाख २३ हजार वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा नाहक त्रास सहन करावा लागला तर महावितरणला देखील वीजविक्रीमध्ये नुकसान सहन करावे लागले आहे.
दरम्यान शहरी व ग्रामीण भागातील विजेचे उपकेंद्र, शेती तसेच सार्वजनिक ठिकाणी किंवा घरे, इमारतींच्या परिसरात असलेल्या वीजयंत्रणेजवळ सुका व ओला कचरा टाकल्यामुळे किंवा वीजतारांखाली उस, गवत किंवा कचऱ्याच्या ढिगारा पेटवल्यामुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होत आहे. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहे. नागरिकांनी वीजयंत्रणेजवळ किंवा वीजतारांखाली कचरा किंवा गवत टाकू नये किंवा त्याचा ढिगारा जाळू नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
COMMENTS