Homeताज्या बातम्यादेश

कर्पूरी ठाकुर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर

शंभराव्या जयंतीनिमित्त त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव

नवी दिल्ली ः बिहारचे दोन वेळ मुख्यमंत्री राहिलेले कर्पूरी ठाकूर यांना देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार मंगळवारी जाहीर करण्यात आला. मरणोत्तर त्य

सानिया मिर्झा आणि शोएब मलिकचा घटस्फोट होणार?
साखर होणार स्वस्त, कारखान्यांना बसणार फटका
कलम 370 हटवण्याचा निर्णय योग्यच

नवी दिल्ली ः बिहारचे दोन वेळ मुख्यमंत्री राहिलेले कर्पूरी ठाकूर यांना देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार मंगळवारी जाहीर करण्यात आला. मरणोत्तर त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  कर्पूरी ठाकुर हे त्यांच्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध होते. कर्पूरी ठाकुर यांची बुधवारी म्हणजे 24 जानेवारी रोजी शंभरावी जयंती आहे. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

बिहारमध्ये जातीय जनगणना आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले असताना केंद्र सरकारने कर्पूरी ठाकुर यांना या सर्वोच्च पुरस्काराने गौरवले आहे. मागासवर्गीयांच्या हितासाठी त्यांनी सातत्याने काम केल्याने त्यांच्या कार्याचा हा सन्मान म्हणून भारतरत्नने त्यांना गौरविले जाणार आहे.कर्पूरी ठाकूर हे दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री आणि एकदा उपमुख्यमंत्री होते. ते बिहारचे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री होते. 1952 मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली. 1967 मध्ये, कर्पूरी ठाकूर यांनी बिहारमध्ये इंग्रजीची आवश्यकता रद्द केली, जेव्हा ते उपमुख्यमंत्री झाले. जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया आणि आचार्य नरेंद्र देव हे सामाजिक व्यवस्था बदलण्यात कर्पूरी यांचे आदर्श होते. कर्पूरी यांच्या पूर्वी समाजवादी चळवळीला केवळ उच्च वर्गाकडूनच पाठिंबा मिळाला होता. ज्यांच्या बळावर समाजवादी चळवळीचा पराभव झाला, अशा लोकांमध्ये कर्पुरी यांनी संपूर्ण चळवळ रोवली. 1970 मध्ये ते सरकारमध्ये मंत्री झाल्यावर त्यांनी आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत केले. उर्दूला दुसर्‍या राजभाषेचा दर्जा देण्यात आला. पाच एकरांपर्यंतच्या जमिनीवरील महसूल रद्द करण्यात आला.

कोण आहेत कर्पूरी ठाकुर?- कर्पुरी ठाकुर हे बिहारच्या सर्वच राजकीय पक्षांना आदर्श असं व्यक्तिमत्व आहे. मागासवर्गीय समाजाचा विकास आणि सामाजिक न्यायाची कल्पना ही तळागाळात पोहोचवण्यासाठी कर्पूरी ठाकूर हे ओळखले जातात. बिहारच्या राजकारणात कर्पूरी ठाकुर हे अतिशय सन्माननीय नाव आहे. कर्पूरी ठाकूर यांचा जन्म 24 जानेवारी 1924 रोजी बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील पितौंझिया या गावा झाला. 1952 मध्ये ते बिहार विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आणि 1988 पर्यंत ते 36 वर्षे बिहार विधानसभेचे सदस्य म्हणून काम केलं. या काळात त्यांनी दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं. एवढी मोठी राजकीय कारकीर्द असली तरीही कर्पूरी ठाकूर हे सर्वात गरीब नेते म्हणून ओळखले जात होते.

COMMENTS