Homeताज्या बातम्यादेश

दिल्लीचे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता

दिल्ली / प्रतिनिधी : दिल्ली सरकारच्या मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नुकतेच जामिनावर बाह

आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.
हिवाळ्यात लहान बाळांची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा
ऑक्सिजन संपल्याने डॉक्टर हतबल ; खासगी रुग्णालये व्हेंटिलेटरवर

दिल्ली / प्रतिनिधी : दिल्ली सरकारच्या मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नुकतेच जामिनावर बाहेर आले आहेत. 13 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आणि त्याच दिवशी संध्याकाळी ते तुरुंगातून बाहेर आले. तुरुंगातून बाहेर पडल्यावर केजरीवाल हे वेगवेगळ्या सभा व कार्यक्रमांमधून केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत आहेत. अशातच त्यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांच्या या घोषणेनंतर यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

COMMENTS