Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुन्या पेन्शन योजनेसाठी सकारात्मक – मुख्यमंत्री शिंदे

ठाणे/प्रतिनिधी ः विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच केला पत्नीचा खून I LOKNews24
देश लोटस चक्रव्युहात अडकला
केएल राहुल आशिया कपच्या दोन सामन्यांमधून बाहेर

ठाणे/प्रतिनिधी ः विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. जुन्या पेन्शन योजनेमुळे राज्या सरकारच्या तिजोरीवर पडणारा भार लक्षात घेता, सरकारचे दिवाळे निघेल, असे देखील त्यांनी सांगितले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे प्रतिपादन शिंदे यांनी केले आहे. विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघातील भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्‍वर म्हात्रे यांच्या प्रचारासाठी ठाण्यात झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

महाराष्ट्राचा शिक्षण विभाग जुनी पेन्शन योजनेचा अभ्यास करत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारचे कर्मचारी संप करण्याच्या तयारीत आहेत. राज्य सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनाबाबत आक्रमक झाले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर, मार्चमध्ये संपावर जाण्याचा इशारा कर्मचार्‍यांनी दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी जुनी पेन्शन योजनेसाठी सकारात्मक असल्याचे सांगितले आहे.  राज्यात 2019 च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना-रिपाईं युतीचे सरकार स्थापन व्हावे, अशी सर्वांची इच्छा होती. मात्र, दुर्देवाने त्यावेळी आपले सरकार स्थापन झाले नव्हते. परंतु, आता सहा महिन्यांपूर्वी भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर जनहितार्थ निर्णय घेण्यात आले. शेतकर्‍यांबरोबरच शिक्षक आणि सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले गेले. त्यामुळे भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळाले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ठाणे-पालघर जिल्ह्यासह एमएमआरडीए क्षेत्रात मेट्रोसह विकासाची कामे सुरू आहेत. भविष्यात रस्त्यावरुन लाखो गाड्या कमी होतील, असे ते म्हणाले.विधानसभेत युतीला बहुमत आहे. पण विधान परिषदेत बहुमतासाठी पाच जागांवर होणार्‍या निवडणुका महत्वाच्या आहेत. या सर्व जागांवर विजय मिळविण्याची संधी आहे. त्यादृष्टीकोनातून युतीच्या कार्यकर्त्यांनी कार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

परीक्षा पे चर्चा महत्वपूर्ण उपक्रम – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिक्षण क्षेत्रावर विशेष लक्ष आहे. वार्षिक परीक्षेच्या काळातील विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण दूर करण्यासाठी त्यांच्याकडून परीक्षा पे चर्चा हा महत्वपूर्ण उपक्रम सुरू आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी काहीही कमी पडू देणार नसल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, असे आवर्जून मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

COMMENTS