Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रशासनात सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा ः श्रद्धा बेलसरे

अकोले ःप्रशासनात काम करताना  प्रशासनाचे प्रमुख म्हणून सकारात्मक भूमिका ठेवून काम केल्यास समाज उत्तम प्रतिसाद देतो. त्या प्रतिसादामध्ये आर्थिक भार

जत्रा हॉटेलवर झालेल्या हल्ल्याचा निघोजमध्ये निषेध
मुंबईतील चर्चेत धनगर आरक्षणावर तोडगा नाहीच
अ‍ॅड. एम. एन. देशमुख महाविद्यालयाची स्वच्छता मोहीम उत्साहात

अकोले ःप्रशासनात काम करताना  प्रशासनाचे प्रमुख म्हणून सकारात्मक भूमिका ठेवून काम केल्यास समाज उत्तम प्रतिसाद देतो. त्या प्रतिसादामध्ये आर्थिक भार उचलण्याची क्षमता असते असे प्रतिपादन महाराष्ट्राच्या माजी माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालक श्रद्धा बेलसरे यांनी केले. अकोले तालुका पत्रकार संघ, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, रोटरी क्लब अकोले, पु. बा. टाकळकर ग्रंथालय व संशोधन केंद्र यांच्या वतीने मॉडर्न हायस्कूल येथील भास्करराव कदम सभागृहात आयोजित संवाद अनुभवांचा कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावरती राज्यपालांचे माजी विशेष कार्यकारी अधिकारी श्रीनिवास बेलसरे, ज्येष्ठ संपादक घनश्याम पाटील, ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत, हिंद सेवा मंडळाचे उपकार्याध्यक्ष दिलीप शहा हे व्यासपीठावर उपस्थित होते.

श्रीमती बेलसरे या आपल्या भाषणात म्हणाल्या की, सरकारी अधिकारी काम करत असताना धावपळ करत असतात. त्यामुळे सरकारची प्रतिमा बनत असते. सरकार ही कोणती वस्तू नाही अथवा व्यक्ती नाही.त्यामुळे सरकारी व्यवस्थेत काम करणारी माणसं जे काम करतात ते काम म्हणजे सरकारी काम अशी प्रतिमा तयार होते. त्यामुळे ते अधिक जबाबदारीने करण्याची गरज असते कारण त्यावरच सरकारची प्रतिमा बनत असते. सरकारी जाहिरातींच्या संदर्भात सरकार ठरवेल तितकी गुंतवणूक करू शकते. त्यावर कोणताही निर्बंध नाही. एसटी महामंडळात काम करत असताना कर्मचार्‍यांना आवाहन केले. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून कर्मचार्‍यांनी पैसे संकलित करून सुमारे 18 बसेस एसटी महामंडळास भेट दिल्या होत्या. कर्मचार्‍यांशी संवाद केल्यास आणि समस्या जाणून घेतल्या चित्र बदलू शकते असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रशासनात काम करताना आलेल्या विविध अनुभवाचे त्यांनी मान्य केली. खरंतर कोणतेही आंदोलन एका उच्च टोकावर पोहोचल्यानंतर नेमकेपणाने केव्हा माघार घ्यायची हे नेतृत्वाला जाणता यावे असे मत त्यांनी व्यक्त केले. लोकराज्य मासिकाचा पाच लाखापर्यंत प्रवास आणि त्यासाठी झालेले प्रयत्न याचा सविस्तर वृत्तांत कथन करत बदलाची मानसिकता ठेवल्यास परिवर्तन शक्य असते असे मत त्यांनी व्यक्त केले.  यावेळी ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, शिक्षणतज्ञ व प्राचार्य हेरंब  कुलकर्णी,भाऊसाहेब चासकर, माजी प्राचार्य शांताराम गजे, मराठी  पत्रकार परिषदेचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख प्रकाश आरोटे आदींनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांना बेलसरे  यांनी समर्पक उत्तरे दिली. कार्यक्रमास  माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर, संतोष  कचरे,भाऊसाहेब मंडलिक, जादुगार हांडे, मॉडर्न  हायस्कूलचे उपमुख्याध्यापक  सुधीर जोशी,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी नहे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश नवले,रोटरी क्लबचे अध्यक्ष  विद्याचंद्र  सातपुते, माजी अध्यक्ष सचिन शेटे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मराठी पत्रकार परिषदेचे  जिल्हाध्यक्ष व रोटरी  क्लबचे संस्थापक  अध्यक्ष प्रा.अमोल वैद्य यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन शिक्षणतज्ज्ञ  संदीप वाकचौरे यांनी केले. उपस्थितांचे  आभार  पत्रकार संघाचे सचिव प्रा.चंद्रशेखर हासे यांनी मानले.

COMMENTS