नाशिक: स्वीगी या भारतातील आघाडीच्या सेवा पुरवठादार व्यासपीठाने आज त्यांचा ‘हाऊ इंडिया स्वीगीड’ म्हणजेच भारतात स्वीगीच्या सेवा कशा वापरल्या गेल्य

नाशिक: स्वीगी या भारतातील आघाडीच्या सेवा पुरवठादार व्यासपीठाने आज त्यांचा ‘हाऊ इंडिया स्वीगीड’ म्हणजेच भारतात स्वीगीच्या सेवा कशा वापरल्या गेल्या याबद्दलचा २०२३ साठीचा अहवाल सादर केला. यात नाशिकमधील खाद्यपदार्थांसंदर्भातील आघाडीचे ट्रेंड्स नमूद करण्यात आले आहेत.नाशकात पारंपरिक महाराष्ट्रीयन चवींची लोकप्रियता कायम आहे. स्नॅक्स किंवा नाश्त्याच्या पदार्थांमध्ये असेच महाराष्ट्रीय चवीचे पदार्थ आघाडीवर आहेत. नाशिककरांनी वडा पाव, पावभाजीसोबतच दाबेली, छोले भटुरे आणि अशा अनेक चविष्ट पदार्थांचा आस्वाद या वर्षात घेतला. यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे या शहरातील एका सर्वात मोठ्या खवय्या व्यक्तीने तब्बल १९,७९१ रुपयांची एक ऑर्डर दिली.ऑर्डर्ससंदर्भातील या ट्रेंड्सबद्दल स्वीगीचे उपाध्यक्ष, नॅशनल बिझनेस हेड सिद्धार्थ भाकू म्हणाले, “नाशिक म्हणजे खाण्यावर प्रेम करणाऱ्या अस्सल खवय्यांचे शहर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या शहरातील अशा पट्टीच्या खवय्यांना सेवा पुरवणारे एक आघाडीचे व्यासपीठ असल्याचा स्वीगीला अभिमान आहे आणि त्यांना चवींच्या प्रांतातील अतुलनीय अनुभव देण्याची आमची बांधिलकीच यातून प्रतित होते. सोयीस्कर सेवा आणि आनंद यासोबत नाशिककरांना विविध चवी उत्साहाने उपलब्ध करण्यास आम्ही बांधिल आहोत.”महाराष्ट्रातील सूवर्ण त्रिकोणात गणले जाणारे नाशिक शहर डायनिंग आऊट संस्कृतीत म्हणजेच बाहेर जेवायला जाण्याच्या सवयींमध्ये फारसे मागे राहिले नाही. नाशिककरांनी स्वीगीच्या माध्यमातून डाइनआऊटवर २१,००,००० रुपयांहून अधिक रकमेची बचत केली आहे. डाइनआऊटमध्ये एका व्यक्तीचे सर्वाधिक म्हणजे ४०,१४७ रु. इतके बिल झाले. जेवणासाठी बाहेर पडण्याच्या सवयीवर स्वीगीचा किती प्रभाव आहे, हे अशा उदाहरणांमधून दिसून येते.नाशिकने डिजिटल डायनिंगचा अनुभवही आत्मसात केला आहे. ऑनलाइन पेमेंट पद्धतींचा अवलंब तब्बल ७५.७८ टक्के ऑर्डर्समध्ये केला गेला आहे.नाशिकमधील उत्साही खवय्यांना उत्तम अनुभव आणि तात्काळ व्यावसायिक सेवा देण्यास स्वीगी बांधील आहे. आपल्या प्रत्येक वापरकर्त्याला अधिक चांगला अनुभव आणि आनंददायी सेवा देण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत आहेत.
COMMENTS