सिरसाळा प्रतिनिधी - सिरसाळा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पासून ते बी.एस.एन.एल कार्यालय पर्यंतचा रोड उकरून ठेवला आहे तसेच हे रोड डॉ.बाबासाहेब आ
सिरसाळा प्रतिनिधी – सिरसाळा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पासून ते बी.एस.एन.एल कार्यालय पर्यंतचा रोड उकरून ठेवला आहे तसेच हे रोड डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पासून सदरील रोड ईदगाह चौक पर्यंत अर्धवट काम करून सोडून दिल्याचे दिसत आहे.ह्या अर्धवट रोडच्या कामामुळे नागरीकांना वाहन चालकाना नाहक त्रास सहन करत वाट शोधावी लागत आहे. परंतू ह्या सर्व बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे तसेच झालेल्या अर्धवट कामामुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही व एखादा अपघात घडल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का असा संतप्त सवाल नागरीकातून उपस्थित केला जात आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते बी.एस.एन.एल कार्यालय पर्यंत चे प्रलंबित राहीलेले काम सार्वजनिक बांधकाम विभाग कधी पुर्ण कराणार? किंवा एखादा अपघात झाल्यावरच सार्वजनिक बांधकाम विभाग जाग येनार का ? अस नागरीकातून बोलले जात जात आहे.
COMMENTS