त्रिकोणी प्रदेशातील राजकीय रस्सीखेच !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

त्रिकोणी प्रदेशातील राजकीय रस्सीखेच !

राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात आदिवासी बहुल वस्ती असल्याने या प्रदेशात भाजप आणि काँग्रेस यांनी अहमहमिका करण्यासाठी क

शर्मिष्ठांचा नेम की गेम !
अनुयायी बाळासाहेबांची तर्कशुद्धता स्विकारतील!
संसदेतील गतिरोध संपवा ! 

राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात आदिवासी बहुल वस्ती असल्याने या प्रदेशात भाजप आणि काँग्रेस यांनी अहमहमिका करण्यासाठी कंबर कसली आहे. परंतु, याच प्रदेशात भिल्लीस्थान निर्मितीचे उद्दिष्ट घेऊन स्थापन झालेल्या भारतीय ट्रायबल पार्टी ने एक वेगळे आव्हान या दोन्ही पक्षांसमोर उभे केले आहे. एरव्ही, देशभरात एकमेकांच्या शत्रूस्थानी असल्याचे भासवून हे दोन्ही पक्ष लढत असले तरी या प्रदेशात आदिवासींचे प्रतिनिधित्व करू पाहणारी भारतीय ट्रायबल पार्टी च्या वाढत्या वर्चस्वाविरोधा दोन्ही पक्ष एकत्र येतात. डुंगरपूर जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भारतीय ट्रायबल पार्टी ला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेस आणि भाजप यांची आजही त्या जिल्हा परिषदेत युती आहे. अशावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील मानगढ धामला “राष्ट्रीय स्मारक” घोषित करण्याची मागणी पुन्हा केली. १ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मानगढ दौऱ्याच्या आधी हे पत्र पाठवले गेले आहे..जालियनवाला हत्याकांडासारखेच  इंग्रजांकडून झालेल्या आदिवासींच्या हत्याकांडासाठी मानगढ धाम ओळखला जातो; आणि कधीकधी “आदिवासी जालियनवाला” म्हणून हे हत्याकांड ओळखले जाते. १७ नोव्हेंबर १९१३ रोजी राजस्थान आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या मानगडच्या डोंगरावर ब्रिटिश सैन्याने शेकडो भील आदिवासींना ठार केले होते. गेहलोत यांनी ८ ऑगस्ट, रोजी मोदींना लिहिलेल्या आणखी एका पत्रानुसार या हत्याकांडात दीड हजार आदिवासी मारले गेले, असा उल्लेख केला आहे. राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशातील आदिवासी या क्षेत्राला एक पवित्र स्थान मानतात. आदिवासींच्या अस्मितेचा हा एक महत्त्वाचा घटक आहे; ज्याचा उपयोग भाजप आणि काँग्रेस दोघेही करत आहेत.या प्रदेशातील आदिवासींकडून ब्राउनी पॉईंट्स मिळवण्याच्या धडपडीमध्ये या क्षेत्रात आदिवासी बहुल प्रदेश म्हणून याचे महत्त्व आणि भारतीय ट्रायबल पार्टी  ची वाढती लोकप्रियता वाढत आहे.  २०१७ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय ट्रायबल पार्टीचे  मुख्य उद्दिष्टांपैकी एक म्हणजे  “भिल प्रदेश” अर्थात भिलीस्तान ची निर्मिती करणे हे आहे. यावरून या क्षेत्राचे महत्त्व आपल्या लक्षात येऊ शकते.  आदिवासी राजकारण आणि समुदायाच्या हितसंबंधांना जोडण्यासाठी बीटीपी प्रयत्न करत असताना बीटीपीने चार राज्यांत पसरलेल्या ३९ जिल्ह्यांमधून एक भिल प्रदेश तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या भागात आदिवासी राखीव जागा गुजरातमध्ये १६, राजस्थानमध्ये १०, मध्य प्रदेशात सात आणि महाराष्ट्रात सहा. राजस्थानमध्ये, आदिवासी बांसवाडा (जेथे सर्व पाच विधानसभा जागा अनुसूचित जमाती किंवा ST साठी राखीव आहेत) या दक्षिणेकडील बहुतांश जिल्ह्यांमध्ये केंद्रित आहेत.डुंगरपूर (चारही एसटीसाठी राखीव), प्रतापगड (दोन्ही जागा एसटीसाठी राखीव), आणि उदयपूर (आठ पैकी पाच जागा एसटीसाठी राखीव आहेत). शेजारच्या सिरोहीमध्ये एसटीसाठी एक जागा आरक्षित आहे.BTP-समर्थित अपक्षांनी डुंगरपूर जिल्हा परिषदेच्या 27 पैकी 13 जागा जिंकल्या, तर भाजप आणि कॉंग्रेसने अनुक्रमे आठ आणि सहा जागा जिंकल्या. या प्रदेशाचे तीन राज्यातील सरकार बनविण्यासाठी निर्णायक बहुमतावर परिणाम होत असल्याने या भागात राजकारण आता तापू लागले आहे.
(दखल)

COMMENTS