Homeताज्या बातम्यासंपादकीय

नितीश कुमारांचे राजकीय भवितव्य

बिहारमध्ये गेल्या आठवड्यात नितीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाची साथ सोडत राजीनामा दिला होता. त्यानंतर काही तासांमध्येच पुन्हा भाजपशी हातमिळवणी क

पाणीटंचाईचे संकट
तपास यंत्रणा आणि राजकीय नाकेबंदी
मंदीचे सावट गडद

बिहारमध्ये गेल्या आठवड्यात नितीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाची साथ सोडत राजीनामा दिला होता. त्यानंतर काही तासांमध्येच पुन्हा भाजपशी हातमिळवणी करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र नितीशकुमार सरकार आज सोमवारी विश्‍वासदर्शक ठराव जिंकणार का, हा महत्वाचा प्रश्‍न आहे. कारण दोन्हीकडील संख्याबळ पाहता, सरकार आणि विरोधकांमध्ये केवळ 10-12 आमदारांचा फरक आहे. अशावेळी बिहारमध्ये चमत्कार होतो की, नितीशकुमार विश्‍वासदर्शक ठराव जिंकून सत्तेवर कायम राहतात, ते काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. वास्तविक पाहता बिहारमध्ये घोडेबाजाराला संधी मिळण्याचे कारण म्हणजे नितीशकुमार यांच्या राजकीय कोलांटउडया सर्वांनीच पाहिल्या आहेत. नितीशकुमार या पंचवार्षिक विधानसभेमध्ये दोनदा राजदसोबत सत्तेत आले, आणि त्यांची साथ सोडून परत भाजपची सोबत घेतली. त्यामुळे नितीशकुमारांची राजकीय विश्‍वासार्हता संपल्यागत जमा आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर नितीशकुमारांच्या पक्षाने आपल्या आमदारांना एकसंध ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर भाजपने देखील बोधगया याठिकाणी विशेष शिबीर घेण्यात आले आहे. कारण भाजपचे 78 आमदार असून, नितीशकुमारांच्या पक्षाचे केवळ 45 आमदार आहेत. मात्र नितीशकुमार पाहिजे तेव्हा युती तोडतात, आणि आघाडीमध्ये सहभागी होतात, कधी त्यांना इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्याचे वेध लागतात, मग ते देशातील विरोधी पक्षाची मोट बांधण्यासाठी देशभर दौरा करतात, आणि त्यांना पुन्हा संकेत मिळतात की, आपले सरकार संकटात आहेत. लगेच ते भाजपशी संधान साधून पुन्हा एकदा भाजपशी हातमिळवणी करतात. हा खेळ बिहारमधील आमदारांना जसा आवडला नाही, तसा तो बिहारच्या आमदारांना देखील आवडला नाही. त्यामुळे बिहारमध्ये आमदार काय चमत्कार करतात, हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे. यासोबतच राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणूकीनंतर नितीशकुमार पुन्हा एकदा दुसर्‍यांसोबत घरोबा करणार असल्याचे किशोर यांनी म्हटले आहे. त्यामुळे नितीशकुमार लोकसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा वेगळी चाल काय चालतात, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपसोबत जाण्याचे नितीशकुमारांचे खरे कारण म्हणजे, लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये धक्का बसायला नको याच हेतूने भाजपने नितीशकुमार यांना जवळ केले. त्याचप्रमाणे नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलालादेखील गेल्या वेळची म्हणजे 2019 ची लोकसभेतील 16 ही सदस्य संख्या राखायची असल्याने त्यांनी पुन्हा भाजपशी घरोबा केला. यात ना कोणते तत्त्व ना विचार, केवळ सत्तेचे समीकरण जुळवायचे असल्यानेच ही नवी मैत्री पुन्हा आकाराला आली. यात भाजपपेक्षा नितीशकुमार यांचीच गरज अधिक दिसते. लोकसभेत फटका बसायला नको, म्हणून त्यांनी केलेला हा घरोबा आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नितीशकुमार पुन्हा एकदा राजससोबत हातमिळवणी केली तर नवल वाटायला नको. वास्तविक पाहता नितीशकुमार यांच्या पक्षाला साधारणपणे 12 ते 15 टक्के मते मिळतात असा गेल्या तीन निवडणुकांचा अनुभव आहे. राज्यात 12 ते 15 टक्के पुढारलेल्या समजल्या जाणार्‍या जातींची मते आहेत. ही मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळतील असा कयास आहे. कारण लोकसभेसाठी भाजपला जसे अनुकूल वातावरण तयार झाले आहे, तसे विधानसभेसाठी होईल अशी शक्यता नाही. श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे भाजपने देशातील वातावरण बदलून टाकले, आणि बहुतांश राजकीय कल आपल्या बाजून करून घेण्यात ते यशस्वी ठरले.परिणामी लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. गेल्या दहा वर्षांत नितीशकुमार यांनी पाचव्यांदा नवा घरोबा केला. विरोधकांच्या बैठकीत नितीशकुमार यांना समन्वयक नेमण्यात आले नाही तेथून ते नाराज झाले. त्यामुळे नितीशकुमारांनी भाजपशी जवळीक साधल्याचे दिसून येत आहे. मात्र यामुळे नितीशकुमारांची राजकीय विश्‍वासार्हता धोक्यात आलेली आहे. 

COMMENTS