बीड : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात दोन वर्षांपूर्वी घडलेल्या आणि संपूर्ण राज्यभर गाजलेल्या महादेव मुंडे खून प्रकरणाच्या तपासाबाबत खोटी माहिती क

बीड : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात दोन वर्षांपूर्वी घडलेल्या आणि संपूर्ण राज्यभर गाजलेल्या महादेव मुंडे खून प्रकरणाच्या तपासाबाबत खोटी माहिती किंवा अफवा पसरविणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बीडच्या विशेष तपास पथकाने (डखढ) प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
सदर प्रकरणातील तपास, विविध मानसशास्त्रीय चाचण्यांचे अहवाल व इतर तपासाशी संबंधित माहिती ही अत्यंत गोपनीय स्वरूपाची असून ती कुठेही प्रसिद्ध किंवा प्रसारित करण्यात आलेली नाही, तसेच ती प्रसारमाध्यमे किंवा सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलेली नसल्याचेही पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. मात्र आता स्वतः पोलिसांनीच प्रसिद्धीपत्रक काढून या प्रकरणात स्पष्ट खुलासा केल्याने अशा प्रकारची माहिती अधिकृतपणे कोणालाही देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खोटी माहिती देऊन अफवा पसरविणार्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रसिद्धी पत्रकाद्वारे पोलीस प्रशासनाने दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे परळी शहर, जि. बीड येथे गुन्हा क्र. 191/2023, भा.दं.वि. कलम 302 अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथक (डखढ), बीड यांच्या मार्फत सुरू आहे. तपासादरम्यान काही संशयित इसमांच्या पॉलीग्राफ (लाई डिटेक्टर), इएजड / ब्रेन मॅपिंग तसेच व्हॉईस नालिसिस अशा मानसशास्त्रीय चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. या चाचण्यांचे अहवाल अत्यंत गोपनीय स्वरूपाचे असून ते तपास यंत्रणेकडे सुरक्षित ठेवण्यात आलेले आहेत. हे अहवाल कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस, प्रसारमाध्यमांना किंवा सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलेले नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अलीकडे या प्रकरणाबाबत विविध माध्यमांतून तसेच सोशल मीडियावरून अप्रमाणित माहिती व अफवा पसरवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कोणीही खोटी माहिती प्रसारित करत असल्यास त्यांच्यावर कायदेशीर तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथक, बीड यांच्यामार्फत योग्य पद्धतीने व पारदर्शक कायदेशीर प्रक्रियेनुसार सुरू असून तपासाच्या हितासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची सखोल पडताळणी करण्यात येत आहे, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS