पुणे ः गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँगनंतर दिवसाढवळ्या गोळीबार करण्याच्या घटना समोर आल्यानंतर आता पुणे शहरात चो
पुणे ः गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँगनंतर दिवसाढवळ्या गोळीबार करण्याच्या घटना समोर आल्यानंतर आता पुणे शहरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. शहरात सातत्याने वाहनचोरीचे प्रकार घडत आहेत. आता तर या चोरट्यांनी चक्क पोलिसांनाच आव्हान दिले आहे. पुणे पोलिस आयुक्तालयासमोरील पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने चोरट्यांनी लंपास केली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
विशेष बाब म्हणजे, चोरी गेलेल्या वाहनांमध्ये पोलिसांच्या तीन दुचाक्यांचा समावेश आहे. त्यामुळे वाहन चोरांना आता पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नुकतीच पुणे लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या कालावधीत पोलिस प्रशासन बंदोबस्तात गुंतले होते. याच गोष्टीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी पोलिस आयुक्तालयासमोरील पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने चोरून नेली. यातील एक दुचाकी एका अज्ञात स्थळी सापडल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, पुणे शहरात अवघ्या अडीच महिन्याच्या काळात चोरट्यांनी तब्बल 400 वाहने चोरी केली आहेत. या वाहनांची किंमत जवळपास दीड कोटींच्या घरात आहे. यामध्ये दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे पुणे शहरात सीसीटीव्हीचे जाळे असूनही हे चोरटे पोलिसांना सापडत नाही. तसेच चोरीला गेलेल्या वाहनांचा देखील कुठलाही थागपत्ता लाग नाही. पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरटे वाहने चोरत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आता या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पुणे पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
COMMENTS