कर्जत/प्रतिनिधी ः पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी कर्जत शहरातील व्यवसायिकांची पोलिस स्टेशन येथे बैठक घेतली. या बैठकीत कर्जतमध्ये नुकत्याच झालेल्

कर्जत/प्रतिनिधी ः पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी कर्जत शहरातील व्यवसायिकांची पोलिस स्टेशन येथे बैठक घेतली. या बैठकीत कर्जतमध्ये नुकत्याच झालेल्या काही दुकानफोडीच्या घटनांवर सविस्तर चर्चा झाली.
याबाबत व्यावसायिकांनी करावयाच्या उपाययोजनांवर बैठकीत चर्चा झाली. कर्जत शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पोलीस निरीक्षक हे स्वतः कर्जत शहरात चालत पेट्रोलिंग करणार आहेत. सर्व व्यापार्यांनी आपले सीसीटीव्ही कॅमेरे चालू स्थितीत आहेत का ? ते रेकॉर्डिंग करतात का? हे पाहण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक बळप यांनी केले. कर्जत शहरात व उपनगरात असलेले रात्रीचे पेट्रोलिंग वाढवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक यांनी यावेळी सांगितले. व्यवसायिकांनी मांडलेल्या अनेक सूचना पोलीस निरीक्षकांनी मान्य केले असून त्यावर सामूहिकपणे काम करण्यात येणार असल्याची माहिती कर्जत शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बिभीषण खोसे यांनी दिली.
COMMENTS