देवळाली प्रवरा : कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींविरुद्ध राहुरी पोलिसांनी कठोर कारवाई करत तिघांना अटक केली असून मंगळवारी (दि. १० मार्च) सायंकाळी आरोपींची शहरातील मुख्य रस्त्यावरून धिंड काढण्यात आली. दि. ८ मार्च रोजी सायंकाळी नगर–मनमाड महामार्गावरील डिग्रस फाटा येथे १० ते १२ जण ट्रक चालकाला लाकडी दांडे व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते. त्यावेळी राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विकास रंगनाथ वैराळ हे नगरकडून राहुरीकडे येत असताना त्यांनी हा प्रकार पाहून आरोपींना थांबविण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. यानंतर त्याच दिवशी रात्री ग्रीन हॉटेल चौक येथे ड्युटीवर असताना संबंधित आरोपी तेथे येऊन हवालदार वैराळ यांना फायटर, लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात वैराळ जखमी झाले. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात खंडू वसंत काळे, वैभव बाबासाहेब तारडे, संतोष अंकुश काळे (रा. बुरुडगाव, ता. जि. अहिल्यानगर) तसेच इतर अनोळखी आरोपींसह एकूण १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी खंडू काळे, वैभव तारडे व संतोष काळे यांना ताब्यात घेऊन गजाआड केले असून इतर आरोपी पसार झाले आहेत. दरम्यान, १० मार्च रोजी सायंकाळी पोलिसांनी अटकेत असलेल्या आरोपींची शहरातील मुख्य रस्त्यावरून धिंड काढून घटनास्थळाचा पंचनामा व तपास प्रक्रिया केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ करीत आहेत.

देवळाली प्रवरा : कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींविरुद्ध राहुरी पोलिसांनी कठोर कारवाई करत तिघांना अटक केली असून मंगळवारी (दि. १० मार्च) सायंकाळी आरोपींची शहरातील मुख्य रस्त्यावरून धिंड काढण्यात आली.
दि. ८ मार्च रोजी सायंकाळी नगर–मनमाड महामार्गावरील डिग्रस फाटा येथे १० ते १२ जण ट्रक चालकाला लाकडी दांडे व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते. त्यावेळी राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विकास रंगनाथ वैराळ हे नगरकडून राहुरीकडे येत असताना त्यांनी हा प्रकार पाहून आरोपींना थांबविण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. यानंतर त्याच दिवशी रात्री ग्रीन हॉटेल चौक येथे ड्युटीवर असताना संबंधित आरोपी तेथे येऊन हवालदार वैराळ यांना फायटर, लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात वैराळ जखमी झाले. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात खंडू वसंत काळे, वैभव बाबासाहेब तारडे, संतोष अंकुश काळे (रा. बुरुडगाव, ता. जि. अहिल्यानगर) तसेच इतर अनोळखी आरोपींसह एकूण १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी खंडू काळे, वैभव तारडे व संतोष काळे यांना ताब्यात घेऊन गजाआड केले असून इतर आरोपी पसार झाले आहेत. दरम्यान, १० मार्च रोजी सायंकाळी पोलिसांनी अटकेत असलेल्या आरोपींची शहरातील मुख्य रस्त्यावरून धिंड काढून घटनास्थळाचा पंचनामा व तपास प्रक्रिया केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ करीत आहेत.

COMMENTS