Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलीस मंत्री जयकुमार गोरे यांचे घरगडी : आ. रोहित पवार

सातारा / प्रतिनिधी : सरकारमध्ये मोठे पद असतानाही राज्यात न फिरता गावात राहून कुडबुड आणि दहशतीचे राजकारण करणार्‍यांविरोधात आम्ही नेहमीच बोलत आलो आहोत

जिल्ह्यात रेव पार्टीचे होणार नाही याची पोलिसांनी दक्षता घ्यावी : जिल्हाधिकारी
स्व. एन. डी. पाटील यांच्या स्वप्नांच्या आड येणार्‍यांना धडा शिकवा : निशिकांत भोसले-पाटील
विश्‍वास साखर कारखान्याकडून प्रतिटन तीन हजार रुपये वर्ग

सातारा / प्रतिनिधी : सरकारमध्ये मोठे पद असतानाही राज्यात न फिरता गावात राहून कुडबुड आणि दहशतीचे राजकारण करणार्‍यांविरोधात आम्ही नेहमीच बोलत आलो आहोत आणि यापुढेही बोलणारच. माण तालुक्यातील पत्रकार तुषार खरात आणि संबंधित पिडीत महिलेला न्याय मिळवून देणार आहे. मंत्र्यांनी इशारा त्यांच्या नेत्यांना द्यावा, आम्हाला नको. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंसाठी पोलिसांनी घरगड्यासारखे काम करू नये, असा हल्लाबोल आ. रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
आ. रामराजेंसाठी तुम्ही वकिली करू नये, या ना. गोरे यांच्या टीकेबाबत विचारले असता आ. रोहित पवार म्हणाले, आम्हाला योग्य वाटते ते बोलणार. पण, जे पदाचा लोकांसाठी वापर करत नाहीत. त्यांना लोकही विचारत नाहीत. पद असतानाही राज्यात न फिरता गावात राहून राजकारण करतात. पत्रकार तुषार खरात आणि महिला तसेच देशमुख परिवाराचा प्रश्‍न आहे. देशमुख परिवाराची संस्था गोरेंनी ताब्यात घेतली. कोरोना काळात नफेखोरी झाली, जमीन बळकावली. हे विषय बाहेर येणार आहेत. लोकांना हे सर्व माहीत आहे. पण दहशतीमुळे कोणी बोलत नाही.
दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयीच्या चर्चांबाबत छेडले असता आ. रोहित पवार म्हणाले, एकत्र येण्याची केवळ चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे आणि दुसरीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये काही संवाद होत नाही, तोपर्यंत चर्चाच राहील. दरम्यान, सातारा हा अनेक गोष्टींसाठी सेफ आहे. पण येथील राजकारण काही सेफ नाही. याठिकाणी कधी काही होईल काही सांगता येत नाही. कोणी काहीही करू शकतो, असेही ते म्हणाले.

COMMENTS