Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परभणीत पोलिसांनी 50 जणांना केले अटक

परभणी : संविधानाच्या प्रतिशिल्पाच्या विटंबनेनंतर आंबेडकरी समाजाकडून बंद पुकारण्यात आला होता. या बंदला हिंसक वळण लागले. यात जाळपोळ आणि दगडफेकीचे प

मानसिक आजारातून मुक्त मातेस 6 वर्षांनी आठवली मुलगी अन् घर
मनाचा कोपरा आणि कोपऱ्यातील कचरा!
दुचाकी विहिरीत पडून एकाचा मृत्यू

परभणी : संविधानाच्या प्रतिशिल्पाच्या विटंबनेनंतर आंबेडकरी समाजाकडून बंद पुकारण्यात आला होता. या बंदला हिंसक वळण लागले. यात जाळपोळ आणि दगडफेकीचे प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी गुरूवारपर्यंत 8 गुन्ह्यांची नोंद करून 50 जणांना अटक केली आहे. पोलिसांवर या प्रकरणी रात्रीच्या वेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवल्याचा आरोप होत आहे. पण नांदेड परिक्षेत्राचे आयजी शहाजी उमाप यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची दोन दिवसांपूर्वी एका माथेफिरूने तोडफोड केली होती. या घटनेविरोधात आंबेडकरी संघटनांनी बुधवारी बंद पुकारला होता. या बंदला हिंसक वळण मिळाले होते. यामुळे पोलिसांनी जमावावर अंकुश मिळवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करत जमावबंदी, इंटरनेट सेवा बंद आदी उपाययोजना केली होती. तसेच मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशनही राबवले होते. त्यात आता अनेक तरुणांना जबर मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच पोलिसांनी रात्रीच्या वेळीही कोम्बिंग ऑपरेशन राबवल्याचा दावा केला जात आहे. नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी गुरुवारी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत रात्रीच्यावेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवल्याचा आरोप धुडकावून लावला. ते म्हणाले, शहरात आता शांतता आहे. पोलिसांनी या प्रकरणी 8 गुन्हे दाखल करून 50 जणांवर अटकेची कारवाई केली आहे. त्यात 41 पुरुष व 9 महिलांचा समावेश आहे.

आयुष्य उद्धवस्त करण्याचा प्रयत्न : सुषमा अंधारे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली पुन्हा एकदा आंबेडकरी अनुयायांचे आयुष्य व भविष्य उद्ध्वस्त करण्याचा आरोप केला आहे. राज्य सरकार कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली पुन्हा एकदा आंबेडकरी अनुयायांचे आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. हा अत्यंत निंदनीय व निषिद्ध प्रकार आहे. घडलेल्या घटनेची चौकशी करण्याऐवजी कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली अशा पिढ्या उध्वस्त करणे निंदणीय असल्याची टीका त्यांनी केली आहे.

COMMENTS