घरफोडी गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार पोलिसांकडून अटक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरफोडी गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार पोलिसांकडून अटक

अहमदनगर/प्रतिनिधी : दोन घरफोडी गुन्ह्यांमध्ये नऊ महिन्यांपासून फरार असणार्‍या प्रदीप ज्ञानदेव भोसले (वय 20, रा.साळंदी रोड, श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा)

खा. विखेंनी ‘अर्बन’ ची निवडणुक टाळण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावावी- सुधीर मेहता
काँग्रेस नेते हार्दिक पटेल,मंत्री धनंजय मुंडे यांची कर्जतला जाहीर सभा
मनपाचा ऑक्सिजन प्लॅन्ट बेचिराख होता होता राहिला…

अहमदनगर/प्रतिनिधी : दोन घरफोडी गुन्ह्यांमध्ये नऊ महिन्यांपासून फरार असणार्‍या प्रदीप ज्ञानदेव भोसले (वय 20, रा.साळंदी रोड, श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा) या पकडण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे.
याबाबतची माहिती अशी की, विशाल नारायण दळवी (रा.शहाजीनगर,कर्जत, ता.कर्जत) यांच्या व आणखी एका ठिकाणी घरी अज्ञात आरोपींनी दि.11 मार्च 2021 या दिवशी रात्रीच्या वेळी घरफोडी केली होती. याबाबत दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. कर्जत पोलिसांनी कसोशीने तपास करून आरोपी निष्पन्न केले. यात विकी विश्‍वास काळे (वय 23, रा.सांगळे वस्ती, श्रीगोंदा ता. श्रीगोंदा), नंद्या पायथ्या पवार (वय 20 वर्ष, रा.साळंदी रोड, श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा) यांना दि.20 एप्रिल 2021 रोजी अटक केले होते व आरोपी प्रदीप ज्ञानदेव भोसले हा फरार होता. या आरोपीस गोपनीय माहितीवरून श्रीगोंदा येथे अटक करण्यात आली आहे. या आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत भाग अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित, पोलिस कॉन्स्टेबल अंकुश ढवळे, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनील खैरे, सलीम शेख, गोवर्धन कदम आदींनी केली आहे

COMMENTS