Homeताज्या बातम्यादेश

पंतप्रधान मोदी आज कारगिलला भेट देणार

नवी दिल्ली ः 25 व्या कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलै रोजी सकाळी 9.20 च्या सुमारास कारगिल युध्द स्मारकाला भेट देऊन द

कोव्हॅक्सिनला जागतिक मान्यता नाही, तरीही मोदी वॉशिंग्टनला उतरले ! एकंदरीत सगळीच गंमत आहे
शेतकर्‍यांचे कल्याण आमचे कर्तव्य ः पंतप्रधान मोदी
स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी सूचना पाठवा ः पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली ः 25 व्या कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलै रोजी सकाळी 9.20 च्या सुमारास कारगिल युध्द स्मारकाला भेट देऊन देशसेवेसाठी कर्तव्यावर असताना सर्वोच्च बलिदान देणार्‍या शूरवीरांना श्रद्धांजली वाहणार आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते आभासी पद्धतीने शिंकून ला या लष्करी बोगद्याच्या कामासाठी सुरुंगाची शुभारंभी वात लावली जाईल. शिंकून ला बोगदा प्रकल्पाअंतर्गत निमु-पदुम-दारचा मार्गावर सुमारे 15,800 फुट उंचीवर 4.1 किमी लांबीचा ट्वीन-ट्यूब बोगदा उभारण्यात येणार आहे.

COMMENTS