नवी दिल्ली ः ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरूवारी महाराष्ट्रात पुणे येथे भेट देणार आहेत. या दिवशी सायंकाळी 6 वाजता जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक
नवी दिल्ली ः ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरूवारी महाराष्ट्रात पुणे येथे भेट देणार आहेत. या दिवशी सायंकाळी 6 वाजता जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक येथून स्वारगेटला जाणार्या मेट्रो रेल्वेला झेंडा दाखवून ते या सेवेची सुरुवात करतील. त्यानंतर साडेसहा वाजता त्यांच्या हस्ते 22,600 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण करण्यात येणार आहे. पुणे मेट्रो रेल्वेच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यान मेट्रो सेवेच्या उद्घाटनाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होईल. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या टप्प्यातील भूमिगत रेल्वे प्रकल्पाच्या कार्याला सुमारे 1,810 कोटी रुपये खर्च आला आहे. यानंतर, सुमारे 2,950 कोटी रुपये खर्चून विकसित केल्या जाणार्या स्वारगेट-कात्रज या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील विस्तार कार्याची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. दक्षिण टोकाकडील सुमारे 5.46 किमी लांबीचा हा विस्तार संपूर्णपणे भूमिगत स्वरूपाचा असून या मार्गावर मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज ही तीन स्थानके आहेत. पुण्यातील भिडेवाडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या पहिल्या कन्याशाळेच्या स्मरणार्थ उभारल्या जाणार्या स्मारकाच्या कार्याची कोनशीला पंतप्रधानांच्या हस्ते ठेवण्यात येईल. महासंगणकीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला स्वावलंबी करण्याप्रती पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने, या दौर्यादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते तीन परम रुद्र महासंगणकांचे लोकार्पण करण्यात येईल.
राष्ट्रील महासंगणक अभियानाअंतर्गत (एनएसएम) सुमारे 130 कोटी रुपये खर्चासह संपूर्ण स्वदेशी पद्धतीने हे महासंगणक विकसित करण्यात आले आहेत. अग्रगण्य वैज्ञानिक संशोधन कार्याची सुलभ सोय करण्याच्या दृष्टीने हे महासंगणक पुणे, दिल्ली आणि कोलकाता या शहरांमध्ये कार्यरत केले जाणार आहेत. पुण्यातील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) या संस्थेतर्फे फास्ट रेडिओ बर्स्ट्स (एफआरबीज) आणि इतर खगोलीय घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी महासंगणकाचा वापर केला जाणार आहे. दिल्ली येथील इंटर युनिव्हर्सिटी अॅक्सिलरेटर सेंटर (आययुएसी) मध्ये भौतिक विज्ञान आणि अणुभौतिकी सारख्या क्षेत्रांमध्ये अधिक संशोधन करण्यासाठी महासंगणक उपयुक्त ठरेल. कोलकाता येथील एस.एन.बोस केंद्रात बसवलेल्या महासंगणकामुळे भौतिकशास्त्र, कोस्मॉलॉजी आणि पृथ्वी विज्ञान या क्षेत्रांतील आधुनिक संशोधनाला मोठी चालना मिळेल. हवामान आणि हवामानाबाबत संशोधनासाठी बनवण्यात आलेल्या हाय-परफॉर्मन्स कम्प्युटिंग (कझउ) प्रणालीचेही पंतप्रधान उद्घाटन करतील. या प्रकल्पासाठी 850 कोटी रुपये इतकी गुंतवणूक करण्यात आली असून, हवामानविषयक प्रणालींमधील भारताच्या संगणकीय क्षमतांची ही लक्षणीय झेप ठरणार आहे.
COMMENTS