Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाच हजार कोटींची जागा अदानींना देण्याचा डाव – राजेश शर्मा

मुंबई : अंधेरीतील कामगार हॉस्पिटल मागील चार वर्षापासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहे. आतापर्यंत 250 कोटी रुपये दुरुस्तीसाठी व 50 कोटी रुपये वैद्य

जिल्हा परिषदेवर आज थाळी-लाटणे मोर्चा
डॉ. उपाध्ये यांचे ’ह मानवा, निर्मिक तू’मधील मानव्य प्रेरणादायी ः शांताताई शेळके
केंद्रियमंत्री रामदास आठवले शुक्रवारी बीड शहरामध्ये :पप्पू कागदे

मुंबई : अंधेरीतील कामगार हॉस्पिटल मागील चार वर्षापासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहे. आतापर्यंत 250 कोटी रुपये दुरुस्तीसाठी व 50 कोटी रुपये वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी देण्यात आले असून ईएसआय कार्पोरेशन हे ह़ॉस्पिटल पुन्हा सुरु करण्यास इच्छुक दिसत नाही. अंधेरीच्या कामगार हॉस्पिटलची पाच हजार कोटी रुपये किमतीची जवळपास 12 एकर जमीन अदानी या उद्योगपतीच्या घशात घालण्याचे षडयंत्र असल्यानेच हे हॉस्पिटल सुरु केले जात नाही, असा गंभीर आरोप करून एक महिन्याच्या आत सरकारने हे हॉस्पीटल सुरु केले नाही, तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी दिला आहे.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना राजेश शर्मा म्हणाले की, अंधेरीमध्ये 1977 साली या कामगार हॉस्पिटलची स्थापना करण्यात आली व 2008 सालापर्यंत हे हॉस्पिटल राज्य सरकारच्या अधिपत्याखाली चालत होते. त्यानंतर हे हॉस्पिटल ईएसआय कार्पोरेशनने 14 एप्रिल 2008 रोजी त्यांच्याकडे वर्ग करुन घेतले. कर्मचारी राज्य विमा महामंडळाने या हॉस्पिटलचे आधुनिकीकरण करुन 500 बेडसचे हॉस्पिटल केले व मेडीकल कॉलेजही सुरु केले. या रुग्णालयात 17 डिसेंबर 2018 रोजी आगीची दुर्घटना घडली व त्यात 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला व 150 जण जखमी झाले. ही दुर्घटना होण्याआधी या रुग्णालयात ओपीडीसह सुपर स्पेशालिटी सुविधा 24 तास सुरु होत्या. पॅथॉलॉजी, रेडिओल़ॉजी, एक्स-रे, सीटी-एमआरआय, ऑपरेशन थिएटसह सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांनी हे रुग्णालय सुसज्ज होते. ओपीडभ विभागात दररोज 1800 ते 2000 रुग्ण भेट देत होते, ब्ल़ड बँकेची सुविधाही उपलब्ध होती. महाराष्ट्रातील अनेक शहरातून कामगार अंधेरीच्या हॉस्पिटमध्ये उपचारासाठी येत होते. मोठ-मोठ्या शस्त्रक्रियाही मोफत केल्या जात होत्या. त्यामुळे ही जागा अदानीला देऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँगे्रसच्या वतीने देण्यात आला आहे. 

COMMENTS