Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयंत प्रिमियर कबड्डी लिगच्या पहिल्याच दिवशीच्या सामन्यांत खेळाडूंची रोमहर्षक चढाई

निनाईनगर : स्व. आनंदराव पाटील क्रीडा नगरीतील ’जयंत कबड्डी प्रिमियर लीग’मध्ये शिराळा कोब्रा संघातील खेळाडूंची यशस्वी पकड करताना स्व. जगदीशआप्पा पाटील

शिराळा तालुक्यात लॉकडाउननंतर पहिल्या कुस्ती मैदानास प्रारंभ
पृथ्वी शॉने पुन्हा आपल्या बॅटने दिले सडेतोड उत्तर
टिम इंडिया जिंकली ; पाकिस्तान हरला 

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर (निनाईनगर) येथील जयंत स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या जयंत प्रिमियर कबड्डी लिगच्या पहिल्या दिवशी राजारामबापू ईगल्स (कासेगाव),स्व.जगदीशआप्पा पाटील रायडर्स (कामेरी),आदिती पँथर्स (ओझर्डे) व स्फूर्ती रॉयल्स (जुनेखेड) या संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघावर मात केली. पहिल्या दिवशीच्या सामन्यांत खेळाडूंनी रोमहर्षक चढाई व पकडी करून क्रीडाप्रेमींच्या डोळ्याचे पारणे फेडले. या लिगमध्ये दररोज दुपारी 4 पासून 8 सामने खेळविले जाणार आहेत.
राष्ट्रीय खेळाडू, माजी नगरसेवक खंडेराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जयंत स्पोर्ट्सने राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत राव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सलग दुसर्‍या वर्षी या लीगचे आयोजन केले आहे. प्रतिक पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते आणि जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके, माजी आमदार दिनकर पाटील यांच्यासह क्रीडा प्रेमींच्या उपस्थित लीगचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर चार सामने खेळविण्यात आले.
या लिगमधील पहिलाच सामना स्व. शरद लाहिगडे हरिकन्स (कासेगाव) विरुध्द स्फुर्ती रॉयल्स (जुनेखेड) या दोन संघात खेळविण्यात आला. स्फुर्ती रॉयल्सने पहिल्यापासून सामन्यावर वर्चस्व ठेवत 25 गुण मिळविले. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघावर 12 गुणांनी मात केली. राजारामबापू ईगल्स कासेगाव विरुध्द राजेंद्रभाऊ युवा मंच फायटर्स (वाळवा), तसेच आदिती पँथर्स ओझर्डे विरुध्द जय हनुमान सहकारी पतसंस्था इस्लामपूर या संघामध्ये अतिशय चुरशीचे सामने झाले. अगदी क्षणा-क्षणाला उत्कंठा वाढविणार्‍या या दोंन्ही सामन्यात राजारामबापू ईगल्सने 4 गुणांनी,तर आदिती पँथर्सने 10 गुणांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळविला. शेवटच्या चौथ्या सामन्यात स्व. जगदीशआप्पा पाटील रायडर्स (कामेरी) या संघाने पहिल्यापासून गुणांची आघाडी घेतली. त्यांनी शिराळा कोब्रा संघास तब्बल 17 गुणांच्या फरकाने पराभूत केले. कामेरी संघातून राष्ट्रीय खेळाडू शुभम पाटील खेळला. सुरेश पाटील (सांगली), प्रसाद देशपांडे (राजारानगर) यांच्या ओघ व त्या शैलीतील समालोचनाने स्पर्धेची रंगत वाढत गेली.
माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील, माजी जि. प. उपाध्यक्ष रणजित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील, शिराळ्याचे पृथ्वी नाईक, विश्‍वप्रताप नाईक, आदिती उद्योग समूहाचे पृथ्वीराज पाटील, वाळव्याचे रवी पाटील, कासेगावचे अतुल लाहिगडे, जुनेखेडचे सागर जाधव, संजय पाटील या संघांच्या मालकांसह त्यांचे समर्थक व क्रीडाप्रेमींनी या लिगमधील पहिल्या दिवसाच्या सामन्यांचा मनमुराद आनंद लुटला.
जयंत स्पोर्ट्सचे अध्यक्ष सागर जाधव, प्रशिक्षक विजय देसाई (सोन्या बापू), उमेश रासनकर, माजी नगरसेवक सदानंद पाटील, सचिन कोळी, शिवाजी पाटील, फिरोज लांडगे, आयुब हवलदार, अजय थोरात, किरण पाटील, अंकुश जाधव, अभिजित पाटील, संदीप कोळी यांच्यासह स्पोर्ट्सचे खेळाडू व कार्यकर्ते लिगचे नेटके संयोजन करत आहेत.

COMMENTS