Homeताज्या बातम्यासंपादकीय

बिहारच्या राजकारणात ‘पीके’ न चालणारं समीकरण !

 बिहारचे राजकारण हे उत्तर प्रदेश पेक्षाही जातीय समीकरणावर अधिक स्पष्ट असते. बिहारमधील राजकारणात १९५५ पासूनच समाजवादी विचारांचा प्रभाव आहे. राम मन

श्री विशाल गणेश मंदिर व शनी-मारुती मंदिर महाआरती करुन भाविकांसाठी खुले
दुचाकीस्वाराला जखमी करून पळून जाणाऱ्या पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना दक्षतेचे आवाहन

 बिहारचे राजकारण हे उत्तर प्रदेश पेक्षाही जातीय समीकरणावर अधिक स्पष्ट असते. बिहारमधील राजकारणात १९५५ पासूनच समाजवादी विचारांचा प्रभाव आहे. राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली दलित-ओबीसी कार्यकर्त्यांची जी जडणघडण झाली; त्यामधूनच बिहारच्या राजकारणात दलित ओबीसी राजकीय नेते उभे राहिले. या नेत्यांनी बिहारच्या राजकारणाला जी दिशा दिली, त्यातून बिहारच्या राजकारणात देशात पहिला ओबीसी मुख्यमंत्री बनला. तत्कालीन मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांनी आरक्षणाची अंमलबजावणी केली; तेव्हापासून बिहारचे राजकारण हे पूर्णपणे दलित ओबीसींच्या प्रभावाखाली राहिले आहे. आता बिहारमध्ये विधानसभा निवडणूक आहेत. या निवडणुकांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे  अवघे पाच दिवस आता उरले आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रचाराच्या फेऱ्या सुरू होतील. मात्र, या दरम्यान बिहारमध्ये आरजेडी आणि काँग्रेस यांचे महागठबंधन आणि दुसऱ्या बाजूला भाजपा, नितीश कुमार यांचा जेडीयू आणि चिराग पासवान यांचा जनशक्ती पक्ष या दोन आघाड्या एकमेकांचे विरोधात उभ्या असताना, तिसरी शक्ती म्हणून जनसुराज पार्टी ही प्रशांत किशोर यांची पार्टी बिहारच्या राजकीय निवडणुकात आता उतरली आहे.  त्यांच्या पक्षाने आतापर्यंत दोन याद्या जाहीर करून १११६ उमेदवारांची घोषणा केली आहे. अर्थात, त्यांच्या उमेदवारी याद्यांमध्ये देखील ओबीसी आणि अति मागासलेले ओबीसी यांचा मोठ्या प्रमाणात जसा भरणा आहे, तसा अल्पसंख्यांक मुस्लिम समुदायाचाही समावेश आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, बिहारच्या राजकारणात एससी, एसटी, ओबीसी, मुस्लिम ही समीकरणे बदलता येणार नाहीत. अर्थात, प्रशांत किशोर आता पावेतो अनेक राजकीय पक्षांचे रणनीती निर्धारक राहिले असले आणि त्या पक्षांना त्यांनी विजय मिळवून देण्याच्या तथाकथित वावड्या असल्या तरीही, प्रशांत किशोर यांच्याकडे जर ती शक्ती असेल तर, ते या निवडणुकीत बिहारमध्ये आपल्या राजकीय पक्षाची सत्ता आणू शकतात! परंतु, वास्तव तसं नाही. प्रशांत किशोर यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा आला आहे. त्या पैशांच्या आधारावर त्यांनी बिहारचे राजकारणामध्ये उडी घेतली आहे. मात्र, त्यांचा पक्ष हा केवळ मतांची कटौती करणारी असेल. बिहारच्या निवडणुकीत विजयाच्या समीप किंवा काही जागा जिंकण्याच्या तयारीत देखील त्यांचा पक्ष नाही. मात्र, त्यांच्या वल्गणा मोठ्या आहेत; तर, दुसऱ्या बाजूला भाजप, जेडीयू आणि चिराग पासवान यांचा जनशक्ती पक्ष यांचं समीकरण देखील जागा वाटपाच्या दृष्टीने काहीसं गुंतागुंतीचे होत आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने जागा वाटपात काही भूमिका घेतली असली तरी, तेजस्वी यादव यांना अडवण्याची त्यांची भूमिका नाही; त्यामुळे काँग्रेस आणि आरजेडी यांचं गटबंधन हे बिहारच्या निवडणुकीत जागा वाटप देखील मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे करेल, असे दिसते. अर्थात, बिहार निवडणुका या दोन आघाड्यांच्या मध्ये होणार असल्या, तरी, जनसुराज पार्टी हा प्रशांत किशोर यांचा पक्ष या निवडणुकीत उतरल्याने लोकांची उत्सुकता वाढलेली आहे. परंतु, लोकांच्या मनात ही गोष्ट ठाम आहे की, प्रशांत किशोर यांच्या पक्षाला कोणतीही भवितव्य बिहारच्या राजकारणात नाही. त्याऐवजी, त्यांनी अन्य राज्यांमध्ये जर काही प्रयोग केले असते तर निश्चितपणे त्यांची शक्ती थोडीफार तरी दिसली असती;  बिहारचे राजकारण हे पूर्णपणे समाजवादी, आंबेडकरवादी आणि डाव्या वळणाचे असल्यामुळे, प्रशांत किशोर यांच्यासारख्या भांडवली व्यवस्थेतून येणाऱ्या राजकीय पक्ष नेत्याला कोणतेही भवितव्य बिहारच्या निवडणुकांमध्ये नाही. प्रशांत किशोर यांनी मोठ्या आवेशात बिहारच्या पारंपारिक राजकारणाला बदलण्याची भाषा यापूर्वी अनेक वेळा केली होती; मात्र, प्रत्यक्ष उमेदवार देताना त्यांनी देखील पासवान, मुसलमान, यादव, राजपूत, ब्राह्मण आणि अतिमागास त्याचबरोबर महादलित या जाती समुदायाच्या उमेदवारांना अधिक प्राधान्य दिलं आहे. अर्थात, जातीय समीकरणात आपल्या पक्षाने समतोल राखल्याच ते म्हणत असले तरी, त्यामध्ये काही तथ्य नाही. कारण, बिहारच्या पारंपारिक राजकारणाला जातीय समीकरणांची जी चौकट बसवली गेली आहे, तिला बदलण्याची हिंमत ते करू शकत नाही! याचाच अर्थ बिहारच्या राजकारणामध्ये ते काही धक्कादायक गोष्टी साध्य करू शकतात, यावर कोणालाही विश्वास ठेवता येणार नाही! परंतु, पैशांच्या अनुषंगाने राजकारणात काही गोष्टी करंता येतात, तीच गोष्ट सध्या प्रशांत किशोर हे बिहारच्या राजकारणात करताना दिसत आहे.

COMMENTS