Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिस्तूल बाळगणारा तडीपार गुंड अटकेत

पुणे : तडीपार कारवाई केल्यानंतरही शहरात वास्तव्य करणार्‍या गुंडाला मुंढवा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन काडतु

औषधी घेऊन जाणारा ट्रक आणि कार मध्ये समोरासमोर धडक ; ट्रक झाला पलटी.
नागाचे कुमठे कुस्ती मैदानात सिकंदर शेख याने महाराष्ट्र केसरी बालारफिक शेखला पाच मिनिटात दाखविले अस्मान
भुमिगत इंटरनेट केबलवर महापालिका ”मिळकत कर” आकारणार

पुणे : तडीपार कारवाई केल्यानंतरही शहरात वास्तव्य करणार्‍या गुंडाला मुंढवा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. तेजस कृपेंद्र पायगुडे (वय 27, रा. केशवनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पायगुडेविरुद्ध गंभीर गु्न्हे दाखल आहेत. त्याला पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले होते. तडीपार केल्यानंतर पायगुडे मुंढवा भागातील लोणकर पेट्रोल पंपाजवळ थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे सापडली. पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्‍विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहायक निरीक्षक आण्णासाहेब टापरे, संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे आणि पथकाने ही कारवाई केली.

COMMENTS