Homeताज्या बातम्यादेश

मध्यप्रदेशमध्ये विमान कोसळून पायलटचा मृत्यू

भोपाळ/वृत्तसंस्था : मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातून एका विमानाचा अपघात झाला आहे. मंदिराच्या शिखराला धडकून प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात झाला आहे

शाळांच्या पायाभूत सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या उद्दिष्टावर भर – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड
बीड मध्ये भरले दुसरे मराठी साहित्य संमेलन
30 ऑगस्टला दिसणार निळा चंद्र

भोपाळ/वृत्तसंस्था : मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातून एका विमानाचा अपघात झाला आहे. मंदिराच्या शिखराला धडकून प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पायलट विशाल यादव यांचा मृत्यू झाला आहे. तर, इंटर्न अंशुल यादव जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मध्यप्रदेशातील चोरहाटा पोलीस स्टेशन हद्दीतील उमरी गावात गुरुवारी रात्री 11.30 वाजता हा विमान अपघात झाला. प्रशिक्षणार्थी विमान एका मंदिराच्या शिखरावर आदळले, त्यामुळे हा अपघात झाला. विमानाला धडकताच आग लागली. या अपघातात वरिष्ठ विशाल यादव याचा पायलटचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर जखमी  इंटर्न अंशुल यादव याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. चोरहाटा पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अवनीश पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रीवा हवाईपट्टीचे विमानतळामध्ये रूपांतर करण्यात येत आहे. खासगी कंपनी अनेक वर्षांपासून विमान प्रशिक्षण घेत आहे. उमरी गावात विमान अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

COMMENTS