Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फार्मसी कॉलेजात आज ‘फार्माफ्युजन’ स्पर्धा

भातकुडगाव फाटा : आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी. फार्मसी, बोधेगाव येथे ५ व्या राष्ट्रीय स्तरावरील ‘फार्माफ्युजन’ वैज्ञानिक पोस्टर सादरीकरण व फार्मा वर्किं

भातकुडगाव फाट्यावरील आंदोलनामुळे वाहतूक कोंडी
भविनिमगावात शिवजयंतीनिमित्त शालेय वस्तूंचे वाटप
माजी आ. घुलेंकडून स्वंयभू काळेश्वराची महापूजा

भातकुडगाव फाटा : आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी. फार्मसी, बोधेगाव येथे ५ व्या राष्ट्रीय स्तरावरील ‘फार्माफ्युजन’ वैज्ञानिक पोस्टर सादरीकरण व फार्मा वर्किंग मॉडेल स्पर्धेचे आयोजन दि.१४ फेब्रुवारी  रोजी करण्यात आले आहे. स्पर्धेच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात आले असून देशभरातील विविध फार्मसी महाविद्यालयांमधून विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाविद्यालयात स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. नोंदणी कक्ष, स्वतंत्र पोस्टर प्रदर्शन हॉल, वर्किंग मॉडेल सादरीकरणासाठी सुसज्ज प्रयोगशाळा, परीक्षकांसाठी स्वतंत्र व्यवस्था तसेच सहभागींसाठी मार्गदर्शन केंद्र उभारण्यात आले आहे. सहभागी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अल्पोपहाराची देखील व्यवस्था करण्यात आल्याची माहिती कार्यक्रम समन्वयक प्रा. सोमनाथ डावखर यांनी दिली.

स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून फार्मसी क्षेत्रातील तज्ज्ञ परीक्षकांकडून पोस्टर व मॉडेल्सचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. संशोधनातील नवकल्पना, औद्योगिक उपयोगिता आणि सामाजिक आरोग्यविषयक उपयुक्तता या निकषांवर स्पर्धकांचे परीक्षण केले जाणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य व उच्च शिक्षण विभाग प्रमुख डॉ. हेमंत गांगुर्डे यांनी दिली. संस्थेचे सेक्रेटरी डॉ. विद्याधर काकडे, माजी  जि.प. सदस्य हर्षदा काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मणराव बीटाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीसिंग काकडे तसेच कॅम्पस डायरेक्टर भाग्यश्री पाटील यांनी स्पर्धेस शुभेच्छा देत बी. फार्मसी प्राचार्य डॉ. हेमंत गांगुर्डे व सर्व प्राध्यापकांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS