Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी फलटणनगरी सज्ज

फलटण / प्रतिनिधी : फलटण येथे राष्ट्रीय किशोर किशोरी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 29 ऑक्टोबर ते दि. 2 नोव्हेंबर 2022 पर्यंत फलटण येथ

टेंभू उपसा सिंचन प्रकल्प कार्यालयाच्या आवारात रयत क्रांतीचे बेमुदत ठिय्या आंदोलन
चार गावच्या टाक्यांसह 72 नळ पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता
भाजपचे विचार तळागाळा पर्यंत पोहचवणार : ना. सत्यपालसिंह बघेल

फलटण / प्रतिनिधी : फलटण येथे राष्ट्रीय किशोर किशोरी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 29 ऑक्टोबर ते दि. 2 नोव्हेंबर 2022 पर्यंत फलटण येथे होणार्‍या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी फलटण नगरी सज्ज झाली आहे. त्यासाठी असणारी आवश्यक सर्व तयारी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
फलटण येथे होणार्‍या किशोर / किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी एकूण 47 संघ भाग घेणार आहेत. त्यामधील 24 संघ किशोर म्हणजेच मुलांचे आहेत तर 23 संघ किशोरी म्हणजेच मुलींचे आहेत. माजी आमदार स्व. श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुल येथील मैदानावर सदरील सामने होणार आहेत. सदरील क्रीडांगणावर प्रेक्षकांसाठी भव्य दिव्य अशी 10 हजार आसन क्षमता असलेली प्रेक्षक गॅलरी उभारली आहे. यामध्ये पत्रकारांसाठी प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया असे कक्ष तयार करण्यात आले आहेत. यासोबतच गुणलेखक कक्ष व पदाधिकारी कक्षही क्रीडांगणावर उभारण्यात आला आहे.
येथे उभारलेल्या गॅलरींना स्व. नगराध्यक्ष अशोकराव देशमुख गॅलरी, स्व. किरण विचारे गॅलरी, स्व. विजयकुमार खलाटे गॅलरी, स्व. विष्णू कुंभार गॅलरी अशी नावे देण्यात आली आहेत. या सोबतच होणार्‍या खो-खो स्पर्धांच्या भव्य अशा प्रवेशद्वारास स्व. पी. जी. शिंदे यांचे नाव देण्यात आले आहे.
क्रीडांगणावर उभारलेल्या चार मैदानांवर सर्व सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यामधील तीन मैदाने ही मातींची असून एक मॅटचे मैदान तयार करण्यात आले आहे. सकाळच्या सत्रात 20 मॅच खेळवल्या जाणार आहेत. सायंकाळच्या सत्रात एकूण 15 मॅच खेळवल्या जाणार आहेत. सायंकाळच्या सत्रातील सर्व सामने प्रकाशझोतात खेळवण्यात येणार आहेत.
सामन्यांमध्ये खेळताना एकूण आठ गट असणार आहेत. त्या सहा गटातून दोन रनर व दोन विनर अशा दोन गटांमध्ये बाद फेरीमध्ये जाणार आहेत. त्यानंतर उपांत्यपूर्व सामना, उपांत्य सामन्या व अंतिम सामना अशा पध्दतीने सामने होणार आहेत.
सकाळच्या सत्रात 2 उपांत्य सामने खेळवले जाणार आहेत. त्यामध्ये 2 किशोरी म्हणजे मुलांचे तर 2 किशोरी म्हणजे मुलींचे सामने होणार आहेत. त्यानंतर तृतीय नंबर साठी सकाळच्या सत्रात सामना होणार आहे. किशोर व किशोरी यांचा अंतिम सामना सायंकाळी मॅटवरील मैदानावर होणार आहे.

COMMENTS