Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर यांचा राजीनामा

फलटण / प्रतिनिधी : फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर व उपसभापती रेखा खरात यांनी पदाचे राजीनामे दिले असून रिक्त पदांवर आता कुणाची वर्णी ला

गुंगीचे औषध घालून महाविद्यालयीन तरुणीवर कब्बडीपटूचा बलात्कार
बारामतीची स्वप्ने दाखविणार्‍यांना त्यांची जागा दाखवा : निशिकांत भोसले-पाटील
येलूरमध्ये तीन सोसायट्यांच्यावर महाडिक गटाचा झेंडा

फलटण / प्रतिनिधी : फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर व उपसभापती रेखा खरात यांनी पदाचे राजीनामे दिले असून रिक्त पदांवर आता कुणाची वर्णी लागणार, याची उत्सुक्ता तालुक्यात लागली आहे. दरम्यान शिवरुपराजे खर्डेकर यांची नुकतीच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे. अशाच परिस्थित त्यांनी राजीनामा दिल्याने सुरुवातीस फलटण तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर शिवरूपराजे खर्डेकर यांनी फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदाचा राजीनामा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांच्याकडे दिला. तर फलटण पंचायत समितीच्या उपसभापती रेखा खरात यांनीही आपल्या पदाचा राजीनामा पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर यांच्याकडे दिला आहे. दोघांचे राजीनामे मंजूर झाल्यानंतर सभापतीपदासाठी विश्‍वजीतराजे नाईक-निंबाळकर हे सभापती पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. उपसभापती पदासाठी कोणाची वर्णी लागणार याबाबतचीही उत्सुक्ता लागली आहे. अगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तोंडावर येवून ठेपल्याने सभापती व उपसभापती पदाच्या निवडीमध्ये मोठी घडामोड होणार आहे.

COMMENTS