Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकप्रतिनिधींनी मतदारसंघाच्या नावात छेडछाड करु नये

लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते भावनिक होऊ शकतात, प्रशासनाने भावनिक होऊ नये

जामखेड ः सामान्य माणसांची एखाद्या बाबींबाबत श्रध्दा, अस्था असणं स्वाभाविक आहे. याच बाबींचा लोकप्रतिनिधी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी उपयोग करतात. काह

अहमदनगर जिल्ह्यातील आठवडे बाजार २९ मार्चपासून १५ एप्रिलपर्यंत राहणार बंद : जिल्हाधिकारी
राज्यपालांचा गैरसमज झाल असावा : महसूल मंत्री थोरात
संगमनेरमध्ये जागतिक ग्राहक दिन उत्साहात

जामखेड ः सामान्य माणसांची एखाद्या बाबींबाबत श्रध्दा, अस्था असणं स्वाभाविक आहे. याच बाबींचा लोकप्रतिनिधी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी उपयोग करतात. काहीही करतांना दिसत आहेत. सामान्य माणसाला व कार्यकर्त्यांना भावनिक करतात. मात्र प्रशासनाला भावनिक न होता नियमानुसार सर्वांगीन विचार करून काम करणे गरजेचे आहे.
अहमदनगर नावाच्या इतिहासाबाबत कोणाला काहीच देणेघेणे दिसत नाही. काही दिवसांपूर्वी अहमदनगरच्या नामांतरणाची घोषणा करण्यात आली त्यातही मोठा संभ्रम आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी नगर, अहिल्यादेवी नगर की आहिल्यानगर याबाबत सर्वच संभ्रमित आहेत. तसेच नगर, अ. नगर असाही सोयीनुसार वापर होत आहे. अहमदनगरच्या नामांतराची जरी घोषणा करण्यात आली असली तरी निवडणूक आयोगाने अहमदनगर मतदारसंघाच्या नावात कोणताही बदल केलेला नाही. लोकसभा अहमदनगर असेच नाव वापरावे याबाबत सामान्य प्रशासन विभागाने 3 एप्रिल 2024 रोजी अधिसूचना काढलेली आहे. असे असताना काही जबाबदार लोकप्रतिनिधी, नागरीक 37-अहमदनगर लोकसभा मतदार संघाऐवजी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी नगर लोकसभा मतदारसंघ, अहिल्यादेवी नगर लोकसभा मतदारसंघ अशी नावात छेडछाड करत आहेत. सोशल मीडियात असे उल्लेख सर्रास करत आहेत यावरून काय संदेश देऊ इच्छितात हेच कळत नाही. जबाबदार लोकप्रतिनिधींच जर मतदार संघाच्या नावात छेडछाड करुन नामांतराचे श्रेय घेऊन मतदारांची दिशाभूल करण्याचे काम करत असतील तर निवडणूक आयोगाने गंभीरतेने दखल घेण्याची गरज आहे. संबधितांना म.शा.दि.3 एप्रिल 2024 ची सा.प्र.विभागाची अधिसूचना प्राप्त झाली नाही का? कायद्याचे उल्लंघन करून ही मनमानी का? असा प्रश्‍न उपस्थित होतो. गुगलनेही कोणतेही शहानिशा न करता आपल्या मँप्सवर केलेले बदल अवघ्या एका महिन्यातच माघारी घेत गुगल मॅप्सवरुन अहिल्यानगर हे काढून मुळ अहमदनगर हे नाव लावले आहे. अहमदनगर महापालिकेने अहमदनगरचे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी नगर असे नामकरण करण्याचा ठराव यापुर्वीच मंजूर केला आहे. मात्र नामांतरणाला केंद्राची मंजुरी मिळत नाही तोपर्यंत अधिकृतरित्या अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणार नाही. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अहमदनगर येथील एका जाहीर सभेत नामांतराला केंद्राची मंजुरी मिळेल असे सांगितले. म्हणजेच नामांतरणाची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. याच कारणावरून निवडणूक आयोगाने मुळ अहमदनगर नाव वापरण्याचा निर्णय घेतला आहे.कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अहमदनगरचे आहिल्यानगर होईल ते स्वागतार्हे असेल मात्र तोपर्यंत कायद्याचे, नियमांचे भान सूजाण लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, व सूजान लोकांनी ठेवावे.

…तोपर्यंत नावात छेडछाड करु नये – सध्या राज्यात शहरांच्या नामांतराबाबत राज्य सरकार धडाधड घोषणा करत आहे. मात्र केंद्र सरकार व निवडणूक आयोगाने आपल्या स्तरावर याबाबत कोणताही निर्णय आद्याप दिलेला नाही. अहमदनगर नावाबाबत निवडणूक आयोगाचे कोणतेही स्पष्ट आदेश नसताना काही लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांकडुन मतदारसंघाच्या नावात छेडछाड करून सोशलमिडीयावर मतदारांची दिशाभूल होत आहे. न केलेल्या व पुर्णतः यशस्वी न झालेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी मतदारसंघाच्या नावात छेडछाड करु नये याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग,  महाराष्ट्र राज्यनिवडणूक आयोग, जिल्हाधिकारी अहमदनगर, तसेच संबधितांना याची दखल घेण्याबाबत शहाजान फकीर शेख अहमदनगर या शिक्षकाने पत्र पाठवले होते. त्यानुसार आयोगाकडून मतदारसंघाच्या नावात कोणताही बदल केला नसल्याचे स्पष्ट लेखी उत्तर मिळाले आहे.

COMMENTS