Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

येत्या काळात लोक ड्रोनने विमानतळावर जातील : नितीन गडकरी

नागपूर/प्रतिनिधी ः ड्रोनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती होतं आहे. त्यामुळे तो दिवस दूर नाही जेव्हा चार जण ड्रोनमध्ये बसून विमानतळावर जातील

अपघातानंतर शाहरुख खान मायदेशी परतला
समृद्धी महामार्गावरील अपघातात एक जण ठार
राज्यात पुढील दोन-तीन दिवस पावसाची शक्यता

नागपूर/प्रतिनिधी ः ड्रोनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती होतं आहे. त्यामुळे तो दिवस दूर नाही जेव्हा चार जण ड्रोनमध्ये बसून विमानतळावर जातील असा नवा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. ते नागपुरात फॉरचून फाउंडेशनच्या युथ एम्पॉवरमेंट समिटच्या समारोपीय कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी गडकरी म्हणाले की, आज शेतीची फवारणी असो, पहाडावरून वजनी साहित्य खाली उतरविणे असो… अनेक कामे ड्रोनमुळे कमी पैशात होत आहे. त्यामुळे भविष्यात ड्रोनचा क्षेत्रात प्रगती होऊन चार माणसं बसून काही अंतरावर सहज जाऊ शकतील असं नितीन गडकरी यांनी सांगितले. नागपूरातील विशेष आर्थिक क्षेत्र मिहानमध्ये 31 मार्चला इन्फोसिसच उदघाटन करणार असून त्यातून 5 हजार नागपूरकर तरुणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. मिहानच्या माध्यमातून आतापर्यंत 87 हजार जणांना रोजगार मिळाला असून पुढील लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापुर्वी 1 लाख लोकांना मिहानमध्ये रोजगार मिळेल असं संकल्प केल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

COMMENTS