Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विरोधकांच्या भूलथापांना आता जनता फसणार नाही : निशिकांत भोसले-पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : आ. जयंत पाटील गेली 35 वर्षे येथील मतदारांना विकास कामांची स्वप्ने दाखवून व भूलथापा मारून त्यांची फसगत करत सत्ता भोगत आह

पोलीस नाईकास लाच घेताना रंगेहाथ पकडले
जयप्रभा स्टुडिओ प्रकरणी आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न
Aurangabad : वाढलेल्या महागाईवर भाजपाने जनतेचेआशीर्वाद मागायला पाहिजे – आ. आंबादास दानवे l Lok News24

इस्लामपूर / प्रतिनिधी : आ. जयंत पाटील गेली 35 वर्षे येथील मतदारांना विकास कामांची स्वप्ने दाखवून व भूलथापा मारून त्यांची फसगत करत सत्ता भोगत आहेत. परंतू आता इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील जनता त्यांच्या या भूलथापांना बळी न पडता परिवर्तनाच्या बाजूने उभी राहील व मला मोठ्या मताधिक्यांनी विजयी करेल, असा विश्‍वास इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी व्यक्त केला.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघात प्रचार दौर्‍यादरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी इस्लामपूर शहरातील व्यापारी असोसिएशन, अजिंक्यनगर, दगडी बंगला आदी भागातील नागरिकांशी संवाद साधला व त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत असणार्‍या प्रश्‍नांची गार्‍हाणी मांडल्या. यावेळी परीवर्तनाच्या बाजूने आम्ही आहोत, असे वचन उपस्थितांनी दिले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केदार पाटील प्रमुख उपस्थितीत होते.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, आ. जयंत पाटील यांच्याकडून विकास कामांबाबत खोट्या प्रचाराचा बनाव सुरू आहे. परंतू येथील जनता त्यांनी केलेला 35 वर्षातील विकास पाहत आहे. त्यांना साधे येथील मूलभूत प्रश्‍न सोडवता आले नाहीत. व्यापारी वर्गाचे प्रश्‍न जैसे थे आहेत. त्यांनी आजपर्यंत फक्त बारामतीच्या गप्पा मारल्या. त्यामुळे आता मतदार बांधव ही त्यांच्या बनावाला परिवर्तन घडवून उत्तर देतील. लोकप्रतिनिधीचे कर्तृत्व कामातून उभा राहते. मला विरोधकांप्रमाणे फक्त निवडणुकीत जनतेचा पुळका येत नाही. लोकसेवेचा वसा, वारसा जपण्यात मी कायम पुढे आहे. सत्ता असो व नसो पण जनसेवेचा वारसा मी कायम ठेवला आहे. मी कोणतीही सत्ता नसताना गेल्या पाच वर्षात इस्लामपूर विधानसभा मतदार संघात केलेली विकास कामे तुमच्या समोर आहेत. हा विकास आणखी गतिमान करण्यासाठी मला या निवडणुकीत आशीर्वाद द्यावेत.
यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS