Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेन्शन धारकांनी केले धरणे आंदोलन, शेकडो निवृत्त कर्मचारी झाले संपात सहभागी

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - ईपीएस 95 कर्मचारी व निवृत्ती कर्मचारी सन्मान्वये व लोक कल्याण संस्थेच्या वतीने आज क्रांती चौकामध्ये आंदोलन करण

एमआयडीसीत कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचा खा.इम्तियाज जलिल यांचा आरोप.
संभाजीनगरमध्ये ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू
मराठवाड्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्येत वाढ

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – ईपीएस 95 कर्मचारी व निवृत्ती कर्मचारी सन्मान्वये व लोक कल्याण संस्थेच्या वतीने आज क्रांती चौकामध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी निवृत्त पेन्शनधारक सहभागी झाले होते‌. निवृत्त कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष कमलाकर पांगरकर म्हणाले. कामगारांनी दरमहा 417, 541 बाराशे 50 अंशदान पेन्शन खंडात दिले आहे आणि देश निर्मितीमध्ये 30 ते 35 वर्षे खर्ची घातले आहे. रक्त घाम गाळून हे समृद्ध बनवला आहे त्यांना आज सरासरी पेन्शन रुपये अकराशे एकत्र कितीही महागाई वाढली तरी त्यात काहीच कवडीची वाढ होत नाही. आज जरी देशाची प्रगती होत असली तरी ईपीएस पेन्शन धारकांची अधोगती होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. ज्यांनी पेन्शन खंडात अंशदान दिले त्यांनी त्यांच्यासाठी सरकारने विविध पेन्शन योजना आहेत. मात्र ज्यांनी पूर्ण सेवा काळात दरमहा अंशदान दिले. त्यांना हे पती-पत्नीला जीवन जगण्यासाठी किमान मासिक पेन्शन 7500 व त्याला महागाई भत्ता माननीय सुप्रीम कोर्टाच्या देण्यानुसार पेन्शनमध्ये कोणताही भेदभाव न करता देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

COMMENTS