पेनड्राइव्हमुळे पितळ उघड ! ३० महिलांचा वरिष्ठ अधिकाऱ्यावर मानसिक व लैंगिक छळाचा आरोप

Homeताज्या बातम्यानाशिक

पेनड्राइव्हमुळे पितळ उघड ! ३० महिलांचा वरिष्ठ अधिकाऱ्यावर मानसिक व लैंगिक छळाचा आरोप

प्रतिनिधी /नाशिक जिल्हा परिषदेत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक व लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. सुमारे ३० महिलांनी तक्रार केली आ

तीन पिढ्यांचे नुकसान टाळण्यासाठी विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार
मराठा आरक्षणासाठी एकाची आत्महत्या
भूकंपातील मृतांना कोयनेत श्रध्दांजली

प्रतिनिधी /
नाशिक जिल्हा परिषदेत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक व लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. सुमारे ३० महिलांनी तक्रार केली आहे. पुराव्यांसाठी पेन ड्राइव्ह सादर करण्यात आले. राज्य महिला आयोग आणि प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. अहवालानंतर कडक कारवाई होणार, असे प्रशासनाने म्हटले आहे.

जिल्हा परिषदेच्या ‘मिनी मंत्रालय’ समजल्या जाणाऱ्या कार्यालयात काम करणाऱ्या सुमारे ३० महिलांनी गेल्या काही वर्षांत एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर मानसिक व लैंगिक छळाचे आरोप केले असून, या आरोपांना पुष्टी देणारे महत्त्वाचे पुरावे पेन ड्राइव्हच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहेत.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोग आणि प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. विशाखा समितीसमोर तक्रारदार महिलांनी साक्ष दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं असून, चौकशी अहवालानंतर कडक कारवाई होणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना ‘पेन ड्राइव्ह’ आणि लेखी तक्रार अर्ज टपालाद्वारे प्राप्त झाला. निनावी तक्रारदाराने लिहिलेल्या या अर्जामध्ये जिल्हा परिषदेतील एका विभागप्रमुखाकडून महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक व लैंगिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला होता. संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाचा धाक दाखविणे, आमिष दाखविण्याद्वारेही अधिकाऱ्याच्या हेतूबाबत शंका उपस्थित करण्यात आली.

या तक्रारीसोबतच पुरावे म्हणून पेन ड्राइव्हमध्ये काही ऑडिओ व व्हिडीओ फाइल्स, संबंधित अधिकारी व शोषित महिला कर्मचाऱ्यांचे आक्षेपार्ह चॅटिंगचे स्क्रीन शॉट, संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेले आक्षेपार्ह मेसेज आदी बाबी पुरावे म्हणून सादर करण्यात आले . या तक्रारीबाबतची माहिती मुख्यालयात पसरताच तक्रारींची संख्या सुमारे ३० च्या घरात गेल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

COMMENTS