Homeताज्या बातम्यादेश

पेमा खांडू तिसर्‍यांदा अरूणाचलच्या मुख्यमंत्रीपदी

इटानगर ः लोकसभेसोबत अरूणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर गुरूवारी सलग तिसर्‍यांदा पेमा खांडू

वेगळे धनंजय मुंडेही …विडिओ व्हायरल |
महाशिवरात्र होणार जोरात ; दोन दिवस पर्वकाळ 
पारनेरच्या भाळवणीत सापडला जिवंत बॉम्ब !

इटानगर ः लोकसभेसोबत अरूणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर गुरूवारी सलग तिसर्‍यांदा पेमा खांडू यांनी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यानंतर चाऊना मीन यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्याशिवाय बिऊराम वाघा, न्यातो दुकम, गानरील डेनवांग वांगसू, वांकी लोवांग, पासांग दोरजी सोना, मामा न्तुंग, दसांगलू पुल, बालो राजा, केंटो जिनी आणि ओझिंग तासिंग यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. इटानगर येथील दोरजी खांडू कन्व्हेन्शन सेंटरमध्ये शपथविधी सोहळा पार पडत आहे. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा समावेश आहे.
इटानगर येथे बुधवारी झालेल्या बैठकीत खांडू यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीला भाजपचे केंद्रीय निरीक्षक रविशंकर प्रसाद आणि तरुण चुग उपस्थित होते. यानंतर खांडू यांनी राज्यपाल केटी परनाईक यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. पेमा खांडू हे 2016 पासून अरुणाचलचे मुख्यमंत्री आहेत. नबाम तुकी यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी प्रथमच पदभार स्वीकारला. खांडू पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा ते काँग्रेससोबत होते. 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

COMMENTS