Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त कोपरगावमध्ये शांतता समिती बैठक उत्साहात

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालूका पोलीस स्टेशन अंतर्गत कोळपेवाडी दुरक्षेत्र येथे परिसरातील सर्व गावच्या सरपंच व प्रतिष्ठित नागरिकांची अहमदनगर जिल्हा प

साई संजीवनी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शरद थोरात
संगमनेर रोटरी क्लब विविध 9 पुरस्कारांनी सन्मानित
राष्ट्रवादीला एकहाती सत्ता द्या : आ. आशुतोष काळे

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालूका पोलीस स्टेशन अंतर्गत कोळपेवाडी दुरक्षेत्र येथे परिसरातील सर्व गावच्या सरपंच व प्रतिष्ठित नागरिकांची अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलबमे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी शनिवार 31 ऑगस्ट रोजी आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या सणाच्या अनुषंगाने शांतता समिती बैठक घेत शांततेत तसेच कायदा व सुव्यवसस्थेचा प्रश्‍न कुठे निर्माण होणार नाही याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी कोळपेवाडीचे सरपंच सूर्यभान कोळपे, सुरेगावचे सरपंच वाल्मिक कोळपे, यांच्या सह सुनील चव्हाण, मौलाना रिजवान सय्यद, मौलाना आदिल, विलास वाबळे, शकील पटेल, दिलीप गोरे, पुंजाजी राऊत , वसंत आभाळे , पत्रकार सिद्धार्थ मेहरखांब यांचेसह कोळपेवाडी दुरक्षेत्र हद्दीतील सर्व गावातील श्री गणेश मंडळांचे अध्यक्ष, हिंदू – मुस्लीम समाजातील  प्रतिष्ठीत नागरीक, गावचे पोलीस पाटील व बीट अंमलदार आदी सह ग्रामस्थ उपस्थित  होते. या प्रसंगी पोलीस निरीक्षक कोळी यांनी सर्वांनी जातीय सलोखा राखत धार्मिक, जातीय तेढ निर्माण होणार नाही तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातुन धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कोणीही आक्षेपार्ह बॅनर लावु नये, देखावे तयार करू नये आदी सह कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार बाबत सुचना देवुन गणेशोत्सव व ईद- ए-मिलाद सण उत्सव शांततेत साजरा करणे बाबत मार्गदर्शन करत जास्तीत जास्त गावांनी एक गाव एक गणपती  बसवण्याबाबत आवाहन केले तसेच सर्व गणेश मंडळानी ऑनलाईन परवानगी अर्ज भरून परवानगी घेणे बाबत देखील सूचना पोलिस निरीक्षक कोळी यांनी देत सर्वाना गणेशोत्सव व ईद- ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या. 

COMMENTS