Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गेवराई येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न

बीड प्रतिनिधी -  बीड जिल्ह्यातील गेवराई येथे श्रीराम नवमी, रमजान ईद,डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच हनुमान जयंती या सणानिमित्त शांतता कमिटीची ब

विंचूरच्या 17 युवकांनी एकाच वेळी विश्व हिंदु परिषद-बजरंग दलात घेतला सहभाग. 
आत्म अहंकाराने पछाडलेल्यांनी स्वतःला तपासावे !
आपचे नेते संजय सिंह यांना जामीन मंजूर

बीड प्रतिनिधी –  बीड जिल्ह्यातील गेवराई येथे श्रीराम नवमी, रमजान ईद,डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच हनुमान जयंती या सणानिमित्त शांतता कमिटीची बैठक गेवराई पोलीस ठाणे येथे संपन्न झाली आहे. वरील सणानिमित्त कुठलाही अनुसूचित प्रकार किंवा समाजाच्या भावना दुखवतील अशा प्रकारच्या कोणत्याही पोस्ट तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तालुक्यातील सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक स्वप्निल राठोड यांनी यावेळी केले. शांतता कमिटीच्या बैठकीस मुस्लीम धर्मगुरु, यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.मात्र या बैठकीकडे नगर परिषद व तहसील प्रशासनाने पाठ फिरवली होती. अशा प्रकारच्या बैठकीस अनुपस्थित राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याची माहिती रिपाइंचे तालुका अध्यक्ष किशोर कांडेकर  यांनी दिली. 

COMMENTS