महाराष्ट्रात कोणत्या क्षणी काय चर्चा घडविली जाईल, याची काहीही शाश्वती नसते. आता प्रसार माध्यमांनी एक विषय उकरून काढला. त्यामध्ये, महाराष्ट्रा

महाराष्ट्रात कोणत्या क्षणी काय चर्चा घडविली जाईल, याची काहीही शाश्वती नसते. आता प्रसार माध्यमांनी एक विषय उकरून काढला. त्यामध्ये, महाराष्ट्रातील पवार आणि ठाकरे या दोन नावांचा राजकारणातील प्रभाव संपवण्यासाठी प्रयत्न होत आहेत का? असा थेट प्रश्न केला. त्या प्रश्नाला उत्तर देताना मनसे नेते राज ठाकरे यांनी होकारार्थी उत्तर देत म्हटले की पवार आणि ठाकरे या दोन नावांना महाराष्ट्राच्या राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न होत आहे; परंतु, ती नावं संपणार नाहीत, असं त्यांनी थेट वाक्य वापरल! वास्तविक, राजकारणामध्ये जेव्हा नेता म्हणून व्यक्ती वावरत असतो; तेव्हा, त्या नेत्याचा प्रभाव हा जनतेवर असतो. जनता त्या नेत्याला आपल्या नेतृत्व स्थानी निवडत असते त्या नेत्याच्या प्रभावामध्ये वावरत असते. असं असताना राजकीय नेतेच त्या राजकीय दुसऱ्या राजकीय नेत्यांची नावे जनतेच्या मनातून कसं घालवू शकतात? हा प्रश्नच आहे. पण, जर या नेत्यांना महाराष्ट्रात संपवलं जात असेल, असा त्यांचा आरोप असेल तर, त्यांनी त्याचा अर्थ असा घ्यायचा की, या नेत्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी निर्णायक काहीही केलेलं नसावं! म्हणून जनता त्यांच्या प्रती आता निष्ठुर झाली असावी! किंबहुना, ते आपल्या कामाचे नाहीत, या निष्कर्षापर्यंत जनता आली असावी; हे समजावं. हा त्याचा अर्थ आहे. जर, याचा मानसशास्त्रीय आपण उलगडा करायला बसलो तर, या संदर्भात प्रसिद्ध मानसशास्त्र तज्ञ अँजेलो यांचे प्रसिद्ध वाक्य आहे की, “लोक तुम्ही जे सांगितले ते विसरतील.” तुम्ही जे केले ते लोक विसरतील, पण तुम्ही त्यांना कसे वाटले ते लोक कधीच विसरणार नाहीत,” . हे खरे असले तरी लोकांच्या आठवणी कमी होऊ शकतात, परंतु त्यात परस्परसंवादाचा भावनिक अभाव असू शकतो. मानवी स्मरणशक्ती परिपूर्ण नसते. तपशील कालांतराने सहजपणे कमी होऊ शकतात. जर कोणी सक्रियपणे पुन्हा जनतेला भेट देत नसेल किंवा केलेल्या विशिष्ट कृतींबद्दल विचार करत नसेल, तर कदाचित नेत्यांना लोक विसरतील, हे समजण्यासारखे आहे. परस्परसंवादादरम्यान एखाद्याला ज्या प्रकारे अनुभवता येते, ते अधिक गहन आणि चिरस्थायी प्रभाव टाकू शकते. तरीही, त्या नेत्याच्या कृतींच्या वैशिष्ट्यांपेक्षा भावनिक ठसा त्यांच्यासोबत जास्त काळ राहू शकतो. मानवी नातेसंबंध अनेकदा परस्परांच्या तत्त्वावर चालतात. लोक त्यांच्यासाठी केलेल्या उपकार किंवा कृती लक्षात ठेवतात; कारण, त्यांना ऋणीपणाची भावना वाटते. त्यामुळे त्यांच्या स्मरणात त्या क्रिया अधिक ठळक होतात. नेता हा जनतेला प्रभावित करूनच नेता बनलेला असतो त्यामुळे जनता त्याला विसरत नाही. परंतु, त्या नेत्याचा दीर्घ अनुभव जेव्हा जनतेच्या मनामध्ये संग्रही होतो की, हा नेता जनतेपेक्षा त्याच्या स्वतःच्या आणि त्याच्या भोवती असणाऱ्या समूहापुरताच तो काम करतो आहे; कालांतराने जेव्हा याचा उलगडा होतो तेव्हा जनतेच्या मनातून ते नेतृत्व हळूहळू उतरायला लागते. आज महाराष्ट्रामध्ये ठाकरे आणि पवार या दोन्ही नावांची स्थिती अशी झालेली आहे. पवार हे पुलोद’च्या राजकारणापासून महाराष्ट्रावर छावून आहेत. परंतु, जनसंपर्कामुळे त्यांचे अनेकांशी संपर्क असले तरी ते, जनतेच्या मनातील तावीत कधीच बनले नाही. ते त्यांच्या जात संबंधातील शेतकरी आणि काही प्रमाणात मध्यमवर्गामध्ये आवडते राहिले असतील; परंतु, सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील तावीत ते कधीच बनले नाही. याउलट, सध्याच्या काळात जर आपण पाहिले तर, देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता जशी जनमानसात ठसली आहे; त्याप्रमाणेच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व कौशल्यपूर्ण असल्याचा ठसा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर उमटला आहे. हा ठसा पुसून काढणं अलीकडच्या काळात कुणालाही सहजासहजी शक्य नाही. त्यामुळे नव्या नेतृत्वाच्या उदयातून जुन्या नेतृत्वाच्या मर्यादा लक्षात आल्यावर, जनता त्या नेतृत्वाला विस्मरणात नेते. याचं कारण जनतेला असं वाटायला लागतं की, हे नेतृत्व दीर्घकाळ राजकारणात असतानाही जनतेची फसगत करत होते. किंवा भावनिक दृष्ट्या केवळ प्रभाव टाकत होते. परंतु, प्रत्यक्षात वस्तुस्थितीमध्ये त्यांच्यासाठी काहीही केलं नाही, ही गत पवार आणि ठाकरे कुटुंबाची महाराष्ट्रात झालेली आहे. त्यामुळे, एखाद्या पत्रकाराने विचारलेल्या या प्रश्नांमध्ये वास्तवता असली तरीही, नाव संपणार नाहीत याचा अर्थ लोकांच्या मनात ही नाव रेंगाळत राहतात. नाव रेंगाळत राहणं आणि ती लोकप्रिय असणं याच्यामध्ये खूप अंतर आहे! हे आधी सर्वप्रथम या नेत्यांनी समजून घ्यायला हवं.
COMMENTS