पाथर्डी : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करणाऱ्या वक्तव्याचा निषेध म

पाथर्डी : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करणाऱ्या वक्तव्याचा निषेध म्हणून शहरातील नाईक चौकात भाजप व विविध हिंदुत्ववादी संघटनांनी सपकाळ यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून निषेध व्यक्त केला.
या आंदोलनात भाजप उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे, बाळासाहेब गीते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन वायकर, नगरसेवक अमोल गर्जे, प्रतीक नांगरे, अजिनाथ मोरे ,सोमनाथ अकोलकर, दीपक महाराज काळे, नारायण पालवे, बबन सबलस, बबलू खोर्दे, लक्ष्मण डांगे, रमेश बोरुडे, धनंजय चितळे, सचितानंद देशपांडे, सोमनाथ बंग, नितीन नरवणे, भाऊ तुपे, सोमनाथ दुधाणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर आंदोलकांनी सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पुतळ्याचे दहन केले.

COMMENTS