Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धनलक्ष्मी शाळेत पालक मेळावा संपन्न

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्कारक्षम आयुष्य देऊया - प्रकाश कोल्हे

नाशिक- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय जोपासत, त्यांच्या क्षमतांना चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यारे घटक म्हणजे शिक्षक व पालक.  यां

धनलक्ष्मी शाळेत आदिवासी लोकजिवनाची झलकी
धनलक्ष्मी शाळेत उपक्रमातून साकारत आहे लोकशाही शिक्षण
धनलक्ष्मी शाळेत शिवजयंतीनिमित्त दुमदुमला शिवरायांचा जयजयकार

नाशिक– विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय जोपासत, त्यांच्या क्षमतांना चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यारे घटक म्हणजे शिक्षक व पालक.  यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांच्या सर्वंकष विकासासाठी मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक संचलित धनलक्ष्मी बालविद्यामंदिर व प्राथमिक तसेच माध्यमिक शाळा येथे ‘पालक मेळावा’ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्थेचे संस्थापक प्रकाश सुकदेव कोल्हे, संस्था सचिव तथा शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती कोल्हे, उपमुख्याध्यापिका पूनम पाटील व पालक प्रतिनिधी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून सरस्वती पूजन करण्यात आले. 

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती कोल्हे यांनी केले. गया पानसरे यांनी सभेला कार्यप्रणाली सांगितली. विविध स्पर्धा परीक्षांविषयी योगिता तांबे यांनी माहिती दिली. तर संस्था व शालेय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या उपक्रमाबद्दल सारिका पवार यांनी माहिती दिली. पुढे होऊ घातलेल्या शिक्षक पालक संघाबद्दलच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल, त्यांना अध्ययनात येणार्‍या अडचणी, समस्या तसेच त्यांच्या प्रगतीविषयी आढावा घेण्यात आला. पालकांशी संवाद साधताना प्रकाश कोल्हे यांनी मुलांच्या मनोविकासासाठी त्यांना संस्कारक्षम आयुष्य देणे गरजेचे असल्याचे सुतोवाच केले. ज्योती कोल्हे यांनी विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखून त्यांच्या कलागुणांना पालक व शिक्षक यांनी चालना द्यावी असे सांगितले.  

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा कुलकर्णी यांनी केले. यावेळी शिक्षक प्रतिनिधी, शिक्षक वृंद व मोठया संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.

COMMENTS